घरव्हिडिओIIT Bombay च्या वर्गात घुसली गाय!

IIT Bombay च्या वर्गात घुसली गाय!

Related Story

- Advertisement -

देशातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आयआयटी मुंबईच्या परिसरात भटक्या गुरांचा वावर वाढला असल्याचं समोर आलं आहे. असाच एक व्हीडिओ समोर आला आहे. आयआयटीच्या वर्गात एक गाय अचानक शिरल्याने इथल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. हा व्हायरल व्हिडिओ असून आयआयटी मुंबईचा असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओत ही गाय वर्गात मोकाट फिरत असल्याचंही दिसतंय. यापूर्वी एका भटक्या बैलाच्या धडकीत एक विद्यार्थी जखमी झाला होता. त्यानंतर आता वर्गातच चक्क गाय फिरत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -