घरव्हिडिओअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकावर फिरवले रोटर

अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकावर फिरवले रोटर

Related Story

- Advertisement -

देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील नंदलाल निकम या शेतकऱ्याने आपल्या शेतातील गट नंबर १४७ मध्ये ४ जून रोजी मका पिकाची पेरणी केली होती. याकामी निकम यांनी शेत तयार करणे, बियाणे, शेणखत, रासायनिक खते, पेरणी, निंदणी, खुरपणी, कोळपणी, कीटकनाशके फवारणी असा जवळपास १० हजार रुपये एकरी खर्च आला आहे. पीक येन बहरात असतांना पिकावर लष्करी अळीने हल्ला केल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कीटकनाशकांची फवारणी करून देखील प्रादुर्भाव वाढतच असल्याने निकम यांनी शेवटी उभ्या पिकावर रोटर फिरविण्याचा निर्णय घेतला. अवघ्या १९ दिवसांच्या पिकावर निकम यांचा चार एकर साठी ४० हजार रुपये खर्च झाला होता. अमेरिकन लष्करी अळीच्या आक्रमणामुळे मका पीक धोक्यात असल्याने देवळा तालुक्यातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

- Advertisement -