घरताज्या घडामोडीकेडीएमटी परिवहन चालकाचा कोरोनामुळे मृत्यू; परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट

केडीएमटी परिवहन चालकाचा कोरोनामुळे मृत्यू; परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट

Subscribe

कल्याण-डोंबिवली महानगरहद्दीत कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच परिवहन सेवेत कार्यरत असणाऱ्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरहद्दीत कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच परिवहन सेवेत कार्यरत असणाऱ्या या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या के.डी.एम.टी बस चालक हे लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा अंतर्गत बस चालक म्हणून कार्यरत होते. २१ जून रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना मनपाच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल केले. परंतु, तिथून त्यांना खाजगी निआँन रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. तिथे त्यांच्या कुटुंबियांनी पन्नास हजार रूपये डिपॉझिट भरल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु झाले. परंतु, गुरुवारी पहाटे कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या या कोरोना योद्धाचा दुर्दैवी मुत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.

चालक असलेल्या कोरोना योद्धाच्या कुटुंबाचा कोरोना ससेमिरा सुटला नसून त्यांचा मुलगा, पत्नी यांचा कोरोना रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने कुटुंब पुरते दुखःद प्रसंगात हावालदिल झाले असून कुटुंबाची प्रशासनाने दखल न घेता फोन करून सांत्वन करण्याचे देखील सौजन्य दाखविले नसल्याचे समजते.

- Advertisement -

याबाबत परिवहन मुख्य व्यवस्थापक मारुती खोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, चालक यांचा कोरोनाने उपचारा दरम्यान मुत्यू झाला असून त्यांना पंतप्रधान योजने अंतर्गत मदत मिळण्याबाबत प्रयत्न करणार असून मुंबई मनपा धर्तीवर ५० लाखांची मदत केली जाईल का?, असे विचारले असता नकारात्मक उत्तर दिले. तसेच पत्नी आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या उपचाराबाबत आपला विभाग काय मदत करणार, असे विचारले असता आपण हतबल असल्याचे सागंत हात झटकले. तसेच अनुकंपा तत्वावर कुटुंबातील एकाला नोकरी बाबत प्रशासन लक्ष देणार असल्याचे सांगितले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार; चालक यांना मधुमेहाचा त्रास होता. शासन धोरणानुसार उच्च रक्तदाब, मधुमेह ग्रस्त आशांना अत्यावश्यक सेवेत शिथिलता द्यावी, असे असताना देखील त्यांना कामावर येण्याची सक्ती का गेली हे सवाल यानिमित्ताने उभे ठाकले आहेत. तर अंतिम संस्कारासाठी रुग्णवाहिकेने ३ हजार रुपयाची मागणी केल्याने वाद झाल्याचे समजते. तर आता प्रशासनाने कोविड योद्धाच्या कोरोनाची लागण झालेल्या पत्नी आणि मुलास रूग्णालयात दाखल करून तातडीने लक्ष दिले पाहिजे आणि कुटुंबाला आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे यानिमित्ताने चित्र दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ऊर्जामंत्र्यांनी वीज क्षेत्राचे शिवधनुष्य पेलावे – प्रताप होगाडे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -