घरव्हिडिओराज नव्हे तर आदित्य ठाकरे बनले उद्धव ठाकरेंचे सारथी

राज नव्हे तर आदित्य ठाकरे बनले उद्धव ठाकरेंचे सारथी

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २२ दिवसानंतर दक्षिण मुंबईतील एचआर रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. उद्धव ठाकरे यांना त्यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवत वर्षावर नेलं. खरं तर आदित्य ठाकरे यांच्या जागी मनसे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे गाडी चालवताना दिसतील असा कयास अनेकांनी बांधला होता. याचं कारण म्हणजे २०१२ साली जेव्हा उद्धव ठाकरे यांनी लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, तेव्हा राज ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवत उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर आणलं होतं.

- Advertisement -