घरमुंबईमुंबई उपनगरात २४४ उमेदवार; सर्वाधिक चांदिवली, अणुशक्तीनगरमध्ये!

मुंबई उपनगरात २४४ उमेदवार; सर्वाधिक चांदिवली, अणुशक्तीनगरमध्ये!

Subscribe

मुंबई उपनगरातल्या २६ मतदारसंघांमधून एकूण २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मुदत होती. या मुदतीत मुंबई उपनगरात अर्ज भरलेल्या एकूण ३३४ उमेदवारांपैकी ३२ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत, तर ५८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे आता मुंबई उपनगरातील एकूण २६ मतदारसंघांमधून २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या २६ विधानसभा मतदारसंघांपैकी १६८ – चांदिवली आणि १७२ – अणुशक्तीनगर या दोन्ही मतदारसंघांत सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी १५ उमेदवार आहेत. तर १५२ – बोरिवली आणि १७७ – वांद्रे पश्चिम या दोन मतदारसंघांत सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी ४ उमेदवार रिंगणात आहेत.

मुंबई उपनगरातील मतदारसंघनिहाय उमेदवार संख्या

१५२ – बोरीवली – ४
१५३ – दहिसर – ८
१५४ – मागाठाणे – ९
१५५ – मुलुंड – १३
१५६ – विक्रोळी – ९
१५७ – भांडूप पश्चिम – ७
१५८ – जोगेश्वरी पूर्व – ७
१५९ – दिंडोशी – १०
१६० – कांदिवली पूर्व – ६
१६१ – चारकोप – ७
१६२ – मालाड पश्चिम – ११
१६३ – गोरेगाव – ९
१६४ – वर्सोवा – ९
१६५ – अंधेरी पश्चिम – ८
१६६ – अंधेरी पूर्व – ८
१६७ – विलेपार्ले – ६
१६८ – चांदिवली – १५
१६९ – घाटकोपर पश्चिम – १३
१७० – घाटकोपर पूर्व – ११
१७१ – मानखुर्द शिवाजीनगर – १०
१७२ – अणुशक्तीनगर – १५
१७३ – चेंबुर – १२
१७४ – कुर्ला – ६
१७५ – कलिना – १४
१७६ – वांद्रे पूर्व – १३
१७७ – वांद्रे पश्चिम – ४

- Advertisement -

मतदार संघ, मतदान केंद्र, मतदार संख्या व उपलब्ध भौगोलिक क्षेत्र यांचा विचार करता मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण ७२ लाख २६ हजार ८२६ एवढी मतदारसंख्या आहे. याशिवाय ७ हजार ३९७ मतदान केंद्र आहेत.


हेही वाचा – अंबरनाथ मतदारसंघात १७ जण निवडणुकीच्या रिंगणात!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -