घरमहाराष्ट्रअरेच्चा! 'घड्याळाचे बटन दाबलं, मत पडलं कमळाला'

अरेच्चा! ‘घड्याळाचे बटन दाबलं, मत पडलं कमळाला’

Subscribe

घड्याळासमोरील बटन दाबल्यानंतर थेट मत हे कमळाला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सातार येथील कोरेगाव मतदारसंघात घडल्याचे समोर आले आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. राज्य विधानसभेच्या २८८ जागांसाठी हे मतदान करण्यात आले तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी देखील सोमवारी मतदान पार पडले. मात्र, या दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला. सातारा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर घड्याळासमोरील बटन दाबल्यानंतर थेट मत हे कमळाला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी आरोप केला आहे.

नेमके काय घडले?

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातल्या खटाव तालुक्यातील नवले गावातील मतदान केंद्रावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घडाळ्यासमोरील बटन दाबल्यास व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत दिल्याचे दिसत होते. ग्रामस्थांना याबाबतची माहिती तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.

- Advertisement -

या घडलेला प्रकाराबाबत ग्रामस्थांनी मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, सुरुवातीला निवडणूक अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु, ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी या संबंधीत शहानिशा केल्यानंतर खरोखरच घड्याळाला मतदान केल्यानंतर ते मत कमळाला जात असल्याचे मान्य केले. त्यानंतर हे ईव्हीएम बदलण्यात आले. मात्र, तोपर्यंत २९० मतदारांनी मतदान केल्याचे ग्रामस्थांनचे म्हणणे आहे.


हेही वाचा – राम कदमांच्या घाटकोपर पश्चिममध्ये वेगळा निकाल लागण्याची शक्यता!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -