घरमुंबईराम कदमांच्या घाटकोपर पश्चिममध्ये वेगळा निकाल लागण्याची शक्यता!

राम कदमांच्या घाटकोपर पश्चिममध्ये वेगळा निकाल लागण्याची शक्यता!

Subscribe

घाटकोपर पश्चिममध्ये सोमवारी मोठ्या संख्येनं मतदार मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे घाटकोपरमध्ये २०१४च्या तुलनेत तब्बल ६ टक्क्यांनी जास्त मतदान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर या वाढलेल्या टक्केवारीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

घाटकोपरच्या दहीहंडी उत्सवामध्ये राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. याच प्रकरणाचा त्यांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघात २०१४च्या तुलनेत यंदा मतांची टक्केवारी तब्बल ६ टक्क्यांनी वाढली आहे. सामान्यपणे मतांची टक्केवारी वाढते, तेव्हा प्रस्थापित नेत्यांविरोधात मतदान होण्याची शक्यता असते. त्यामुळे या वाढलेल्या मतांचा फटका राम कदम यांना बसणार असल्याचं बोललं जात आहे. अर्थात, ही ६ टक्के मतं किती ठरतात आणि समोरच्या उमेदवाराला किती मतं पडतात, त्यावर सगळी गणितं अवलंबून असतील.

…तर राम कदम यांना मोठा फटका!

राम कदम यांच्याविरोधात काँग्रेसचे आनंद शुक्ला आणि मनसेचे गणेश चुक्कल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकांच्या आधी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात मोठा रोष पाहायला मिळाला होता. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तर थेट बंडखोरी करत राम कदम यांचा प्रचार करणार नाही, असं बॅनर लावून जाहीर केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राम कदम यांच्यासाठी ही निवडणूक कठीण झाली होती. त्यातच आता घाटकोपर पश्चिममध्ये २०१४च्या तुलनेत मतांची टक्केवारी वाढली आहे. २०१४मध्ये घाटकोपर पश्चिममध्ये ४९.७६ टक्के मतदान झालं होतं. यंदा तिथे ५५.९३ टक्के मतदान झालं आहे. जर ही वाढलेली मतं त्यांच्या विरोधात गेली, तर त्यांच्यासाठी हा मोठा फटका ठरू शकतो.

- Advertisement -

वाचा काय म्हणाले होते राम कदम – अहो राम कदम, महिलांबद्दल हे काय बोलून बसलात?

दरम्यान, मुंबईच्या चांदीवली आणि अणुशक्ती नगर मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणावर मतदान वाढलं आहे. त्यामुळे नसीम खान आणि नवाब मलिक यांच्यासाठी देखील यंदा सकारात्मक चिन्ह असल्याचं बोललं जात आहे.

मतदान वाढलेले इतर मतदारसंघ!

  • चांदीवली – ४४.३१ वरून ५२.३३ टक्के
  • अणुशक्ती नगर – ४६.७४ वरून ५५.३० टक्के
  • मालाड पश्चिम – ५०.०१ वरून ५५.३७ टक्के
  • विक्रोळी – ५१.५६ वरून ५५.५४ टक्के
  • चेंबूर – ५२.४७ वरून ४९.६६ टक्के
  • वांद्रे पूर्व – ४७.२० वरून ५०.६५ टक्के
  • मागाठाणे – ५२.७२ वरून ५५.८३ टक्के
  • दहिसर – ५०.४७ वरून ५३.१७ टक्के
  • चारकोप – ५०.१८ वरून ५२.९२ टक्के
  • अंधेरी पूर्व – ५३.४९ वरून ५३.६५ टक्के
  • भांडूप पश्चिम – ५५.३१ वरून ५६.९३ टक्के
  • मानखुर्द शिवाजीनगर – ४१.६५ वरून ४४.८२ टक्के
  • बोरीवली – ५३.६४ वरून ५४.२० टक्के
  • दिंडोशी – ५३.८६ वरून ५४.१२ टक्के
  • वर्सोवा – ४१.५९ वरून ४२.६६ टक्के
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -