घरमुंबईप्रदीप शर्मा अखेर शिवसेनेत! उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन!

प्रदीप शर्मा अखेर शिवसेनेत! उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन!

Subscribe

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी अखेर त्यांच्या राजकीय भवितव्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रदीप शर्मा नक्की कोणत्या पक्षात जाणार? याविषयी उत्सुकता होती. ते शिवसेनेतच प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू होती. अखेर या चर्चा खऱ्या ठरवत प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, ‘बाळासाहेब ठाकरेंचा माझ्यावर सुरुवातीपासूनच प्रभाव होता. उद्धव ठाकरे मला लहान भावासारखे आहेत, म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला’, अशी प्रतिक्रिया प्रदीप शर्मा यांनी दिली.

‘कर्तव्यदक्ष अधिकारी शिवसेनेत’

दरम्यान, यावेळी प्रदीप शर्मा यांचं कौतुक करताना ‘आज एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्यांनी आजवर आपलं कर्तव्य पार पाडलं आहे. आता हे कर्तव्य देखील ते चोखपणे पार पाडतील’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – विधानसभा निवडणूक लढण्याबाबत मनसेचे तळ्यात-मळ्यात!

नालासोपाऱ्यातून मिळणार उमेदवारी?

प्रदीप शर्मा यांनी नुकतीच निवडणूक लढवण्यासाठी पोलीस सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. सध्या ते ठाण्यामध्ये वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रुजू होते. ८ जुलै रोजी त्यांनी राजीनामा सादर केला होता. तो २१ ऑगस्ट रोजी मंजूर करण्यात आला असून काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने त्यासंदर्भात आदेश काढले आहेत. आता प्रदीप शर्मा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असून त्यांना नालासोपाऱ्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, याविषयी विचारले असता उद्धव ठाकरेंनी यावेळी शर्मा यांच्या उमेदवारीविषयी काहीही बोलण्यास नकार दर्शवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -