घरमहाराष्ट्रजिंकल्यानंतर पहिले अदानीची लूट थांबवणार - नवाब मलिक

जिंकल्यानंतर पहिले अदानीची लूट थांबवणार – नवाब मलिक

Subscribe

अदानीच्या हातात इलेक्ट्रिसिटी गेल्यानंतर गरीबांना महागात वीज विकली जात आहे. मी निवडून आल्यानंतर अदानीची लूट थांबवणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज चेंबूर येथे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नवाब मलिक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. “दहा वर्षांपासून मी माझ्या मतदारसंघात जनतेला पाणी देण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघात नवीन आयटीआय कॉलेज आणि शताब्दी हॉस्पिटलमध्ये मेडीकल कॉलेज आणण्याचे प्रस्तावित होते. मात्र विद्यमान आमदाराने आयटीआय कॉलेजची जमिन बिल्डरच्या घशात दिली. मतदारसंघातील मतदारच आता माझ्या काळातील काम आणि विद्यमान आमदारांच्या कामाची तुलना करत आहेत. आता २१ ऑक्टोबरला जनता योग्य तो निर्णय घेईल”, असे नवाब मलिक आपल्या भाषणात म्हणाले.

मतदारसंघात बोकाळलेली हप्तेखोरी थांबविण्यासाठी यावेळी डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या, असे आवाहन नवाब मलिक यांनी उपस्थितांना केले. बीपीसीएल कंपनीचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र मी स्वतः कामगार आणि खासगीकरणाच्या आड उभा राहणार आहे. कामगारांचे जिथे जिथे अहित होत असेल तिथे संघर्ष करण्याचे काम मी करणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

फुले दाम्पत्यांना भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी आम्ही मागच्या पाच वर्षांपासून करत होतो. मात्र सरकारने पाच वर्षात काहीच केले नाही. त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी सावरकर यांना भारतरत्न द्यायेच होते, म्हणून त्यात फुले दाम्पत्यांचेही नाव यादीत टाकले. आम्हाला तर वाटते की, मोदींनीही स्वतःचे नाव भारतरत्नच्या यादीत टाकून घ्यायला हवे, कारण त्यांचे सरकार गेल्यानंतर त्यांना कुणीही भारतरत्न देणार नाही.

#Live: शरद पवार यांची उमेदवार नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी मुंबईत जाहीर सभा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 16, 2019

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -