घरमहाराष्ट्रकणकवली-देवगड मतदारसंघातून नितेश राणेंची बाजी

कणकवली-देवगड मतदारसंघातून नितेश राणेंची बाजी

Subscribe

महाराष्ट्र राज्यात २१ ऑक्टोबरला २८८ जागांसाठी मतदान पार पडलं. विधानसभा निवडणूकीचा प्रत्येक मतदारसंघातील विजयी उमेदवाराची नावं समोर येत असताना कणकवली-वैभववाडी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितेश राणे विरुद्ध शिवसेना उमेदवार सतीश सावंत अशी चुरशीची लढत होती. यावेळी नितेश राणे यांना बहुमत मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आहे. नितेश राणेंच्या प्रचारासाठी या मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी सभा घेतली होती. कणकवली मतदारसंघातून या विधानसभा निवडणूकीत लढत देण्यास भाजपाचे नितेश राणे विरूद्ध शिवसेनेचे सतीश सावंत उभे होते.

विधानसभा २०१४ च्या निवडणुकीत कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघात नितेश राणेंना ७४ हजार ७१५ मतं मिळाली होती तर भाजपाचे उमेदवार प्रमोद जठारांना ४८ हजार ७३६ मतं मिळाली होती. त्यामुळे यंदाही २०१९ च्या विधानसभेत नितेश राणे आघाडीवर असल्याने विधानसभेची मतमोजणी पूर्ण होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.

- Advertisement -

सावंतवाडीमधून शिवसेनेचे दीपक केसरकर विजयी

सावंतवाडीमधून शिवसेनेचे दीपक केसरकर हे ३ हजार ५१० मतांनी आघाडीवर होते. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात शिवसेना उमेदवार दिपक केसरकर विरुद्ध राष्ट्रवादीचे बबन साळगांवकर विरुद्ध भाजपचे बंडखोर उमेदवार राजन तेली अशी तिरंगी लढत रंगली होती. या चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे दीपक केसरकर हे विजयी झाले आहे.

कोकणात एकून २४ जागांसाठी मतदान झाले होते.  २०१४ मध्ये झालेल्या निवडणूकीत शिवसेनेने कोकणात आपले वर्चस्व राखल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार दिपक केसरकर यांचा बहुमतांनी विजय झाला आहे.


कणकवली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६८
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -