घरमुंबईबंडखोर तृप्ती सावंत यांना शिवसेनेकडून अभय

बंडखोर तृप्ती सावंत यांना शिवसेनेकडून अभय

Subscribe

विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या विरुद्ध बंडखोरी करणाऱ्या तब्बल १४ शिवसेना पदाधिकाऱ्यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कठोर कारवाई करत बंडखोरी करणाऱ्यांना पक्षा बाहेरचा रस्ता दाखवलाय. पण, या यादीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तृप्ती सावंतनंतर राजूल पटेल, संजय भालेराव यांचीही नावं या यादित दिसत नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने निष्ठावंतांना डावललं म्हणून अनेक नाराज शिवसैनिकांनी बंडखोरी केली. तृप्ती सावंत या वांद्रे पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. तर, याच मतदारसंघातून मनसेचे अखिल चित्रेही या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे, यंदा कोणाला मत द्यायचं? असा प्रश्न या मतदारसंघातील लोकांना पडला आहे.

हकालपट्टी केलेल्या बंडखोरांची नावं

प्रकाश कौडगे – नांदेड दक्षिण विधानसभा
बाबुराव कदम कोहळीकर – हदगाव विधानसभा
महेश कोठे – सोलापूर मध्य विधानसभा
मनोज शेजवळ – मोहोळ विधानसभा
कैलास पाटील आणि इंदिरा पाटील – चोपडा विधानसभा
अण्णासाहेब माने आणि संतोष माने- गंगापूर विधानसभा
विजयराज शिंदे , सिंधुताई खेडेकर ,अर्जुन दांडगे – बुलडाणा विधानसभा
अनिरुद्ध रेडेकर – चंदगड विधानसभा
कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंगराज – कोल्हापूर उत्तर विधानसभा
संदीप दबडे – हातकणंगले
शानाभाऊ सोनावणे – सिंदखेडा विधानसभा
राम पाटील – जिंतूर विधानसभा
डॉ. संजय कच्छवे – पाथरी विधानसभा
अॅड. विशाल होबळे – केज विधानसभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -