घरमहाराष्ट्रनितेश राणे संघाच्या कार्यक्रमात

नितेश राणे संघाच्या कार्यक्रमात

Subscribe

नारायण राणे आणि निलेश राणे यांच्याआधी नितेश राणे भाजपवासी झाले. मात्र भाजपवासी झालेल्या नितेश राणे यांनी चक्क आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपमध्ये प्रवेश न देता थेट त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांना भाजपने तिकीट देत भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे नारायण राणे आणि निलेश राणे यांच्याआधी नितेश राणे भाजपवासी झाले. मात्र भाजपवासी झालेल्या नितेश राणे यांनी चक्क आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. सोशल मीडियावर तर नितेश राणे यांचा हा संघाच्या कार्यक्रमात बसलेला फोटो व्हायरल होत असून, त्यावर आता प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. जमसंड येथे दरवर्षी संघाकडून विजयादशमीनिमित्त संचलन केले जाते. मात्र यावेळ या कार्यक्रमाची चर्चा झाली ती नितेश राणे यांच्या उपस्थितीने.

नितेश राणे कणकवलीचे भाजपाचे उमेदवार

दरम्यान, कणकवली मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे नितेश राणे हे यंदा भाजपमधून निवडणूक लढत आहे. तसेच त्यांच्यासमोर शिवसेनेच्या सतीश सावंत यांचे देखील आव्हान आहे. एवढेच नाही तर भाजपच्या संदेश पारकर यांनी देखील सतीश सावंत यांना पाठिंबा दिला असून, नितेश राणे यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यामुळे नितेश राणे हे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पहायला मिळत आहे. याचेच प्रत्यय म्हणून की काय एरव्ही संघाला विरोध करणारे नितेश राणे आज संघाच्या कार्यक्रमात दिसले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे देखील होते.

- Advertisement -

हेही वाचा – सौदी अरेबियाच्या प्रिन्सकडून इम्रान खान यांचा अपमान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -