घरमहाराष्ट्रअर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीत बंडाचे झेंडे फडकले

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीत बंडाचे झेंडे फडकले

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी महायुतीत बंडाचे झेंडे फडकले. वांद्रे पूर्वमध्ये शिवसेना तर कल्याण पश्चिममध्ये भाजपच्या विद्यमान आमदाराने बंडखोरी करून महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला आव्हान दिले. महायुतीला बंडखोरीचे ग्रहण लागले असताना घाटकोपर पूर्वमध्ये माजी मंत्री प्रकाश मेहता यांच्या समर्थकांनी जोरदार राडा केला. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस महायुतीसाठी कमालीचा तणावाचा ठरला.

शिवसेनेने वांद्रे पूर्वमधून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. ही बंडखोरी नव्हे तर न्याय हक्काची लढाई, असे सांगत सावंत यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे. तृप्ती सावंत या २०१५ च्या विधानसभा पोटनिवणुकीत नारायण राणे यांचा पराभव केला होता. शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी वर्सोव्यातून भाजप उमेदवार भारती लवेकर यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. तर भांडूपमधून उमेदवारी नाकारल्याने आमदार अशोक पाटील यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. कल्याण पश्चिम हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेना उमेदवाराच्या दंड थोपटले आहेत.

- Advertisement -

घाटकोपरमध्ये राडा

दरम्यान, माजी मंत्री प्रकाश मेहता यांना घाटकोपर पूर्वमधून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी मेहतांच्या निवासस्थानासमोर जोरदार राडा केला. भाजपची उमेदवारी मिळालेल्या नगरसेवक पराग शहा यांच्या गाडीची तोडफोड करत त्यांच्या समर्थकांना मेहतांच्या समर्थकांनी जबरदस्त चोप दिला. या राड्यामुळे घाटकोपर पूर्व परिसरात सकाळी तणावपूर्ण वातावरण होते. मुंबई महापालिका निवडणुकीत मेहता यांनीच पराग शहा यांना उमेदवारी मिळवून दिली होती. आता मेहतांना शह देण्यासाठी भाजपने शहांचा वापर केल्याने कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

भाजपमधील धुसफूस उघड | प्रकाश मेहतांना वगळल्यानंतर पराग शहांच्या गाडीवर हल्ला

भाजपमधील धुसफूस उघड | प्रकाश मेहतांना वगळल्यानंतर पराग शहांच्या गाडीवर हल्ला

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 3, 2019

- Advertisement -

सुनील राणे ‘गो बॅक’

उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भाजपने बोरिवलीतून तिकीट नाकारल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. बोरिवली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील राणे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आपला रोष प्रकट केला. ‘सुनील राणे गो बॅक’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. मात्र, तावडे यांनी पक्षाचा निर्णय मान्य असल्याची भूमिका घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा रोष शांत झाला.

कल्याणमध्येही बंडखोरी

कल्याण पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदरासंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. पूर्वमध्ये भाजप उमेदवार गणपत गायकवाड यांच्या विरोधात शिवसेनेच्या धनंजय बोडारे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. तर पश्चिममध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात नरेंद्र पवार यांनी बंडखोरी केली आहे.

हेही वाचा –

मुख्यमंत्र्यांची मालमत्ता ३.७८ कोटी; ४ खासगी तक्रारींचाही समावेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -