घरमुंबईशिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाविषयी आठवलेंचं मोठं वक्तव्य

शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाविषयी आठवलेंचं मोठं वक्तव्य

Subscribe

शिवसेनेच्या या प्रस्तावावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसताना महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेना भाजपसमोर काही अटी ठेवण्याची शक्यता आहे. त्यानुसार शिवसेना भाजपसमोर अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाची प्रमुख मागणी करणार आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसताना महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या प्रस्तावाला त्यांनी समर्थन दर्शवले आहे. एवढेच नाही तर भाजपने शिवसेनेच्या प्रस्तावाचा गांभिर्याने विचार करावा असे म्हटले आहे. त्याचवेळी शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साथ देणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेची भूमिका योग्य

शिवसेनेची भूमिका योग्य आहे, असे म्हणत आठवले म्हणाले की, “शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत मांडलेला प्रस्ताव भाजपने गांभिर्याने घेण्याची गरज आहे. किंवा हा प्रस्ताव भाजपला मान्य नसल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्यात यावं. यासह राज्यात दोन-तीन जास्त मंत्रिपदे व केंद्रात जास्तीचं मंत्रिपद सेनेला द्यावं. आणि सत्तास्थापनेचा तिढा सोडवावा, असा सल्ला आठवले यांनी भाजपला दिला आहे. तसेच यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करण्यास तयार असल्यांचसुद्धा आठवले यांनी सांगितलं. दरम्यान महायुतीच्या सत्तेत रिपब्लिकन पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद व एक राज्यमंत्रिपद देण्यात यावं, एवढीच मागणी असल्याचे आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -