घरमहाराष्ट्रकाय चौकशी करायची ती करा, असे लय बघितले - शरद पवार

काय चौकशी करायची ती करा, असे लय बघितले – शरद पवार

Subscribe

आमची काय चौकशी करायची ते करा, असले लय बघितले. त्यामुळे आता जे दाखवायचे ते आम्ही दाखवू, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी इस्लामपूर मतदारसंघात उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यांचा अर्ज दाखल केल्यानंतर इस्लामपूरमध्ये पहिल्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचाररॅलीत प्रचंड गर्दी पहायला मिळाली. या रॅलीनंतर शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी जाहीर

- Advertisement -

नेमके काय म्हणाले शरद पवार?

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्या विरोधात ईडीने शरद पवार यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणावरुन शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. ‘बापजन्मांत गुन्हा न करुनही माझे नाव घेतले जाते. ईडीने काय चौकशी करायची ते करावी, असे लय बघितले. आता आम्हीही काय दाखवायचे ते दाखवू’, असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा – निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांना प्रतिज्ञापत्र प्रकरण भोवणार?

- Advertisement -

सरकारला ज्ञान नाही – शरद पवार

शरद पवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘देशात कुठेही जा शेतीमालाच्या संबंधी तक्रारी आहेत. या सरकारला ज्ञान नाही. कांद्याची निर्यातबंदी का रोखली? विचारले तर रोजच्या खाण्याचे काय होईल? असे म्हणणाऱ्यांना खायला असा किती कांदा लागतो? शेतकऱ्यांना काहीच मिळू न देण्याची या सरकारची नीती आहे’, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -