घरमहाराष्ट्रवाघ गुरगुरतो म्हणून आपण त्याला सोडून देत नाही - सुधीर मुनगंटीवार!

वाघ गुरगुरतो म्हणून आपण त्याला सोडून देत नाही – सुधीर मुनगंटीवार!

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर परखड शब्दांत टीका केली असतानाच आता सुधीर मुनगंटीवार यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘मी वनमंत्री म्हणून वाघाच्या संरक्षण आणि संवर्धनाचं काम केलंच आहे. वाघ थोडासा गुरगुरतो. पण म्हणून काही त्याला सोडायचं नसतं. त्याचं संरक्षण आणि संवर्धन करायचंच असतं’, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांनी लगावला आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘सामनामधून अनेकदा परखड टीका करण्यात आली आहे. पण आम्ही हे ठरवलं आहे की त्याला रागाने नाही तर प्रेमाने उत्तर द्यायचं आहे’, असं देखील सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. ‘सामना’च्या शनिवारच्या अग्रलेखातून सुधीर मुनगंटीवार यांच्या राष्ट्रपती राजवटीसंदर्भातल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला होता. मात्र, ‘मी कधीही धमकीची भाषा केली नाही’, असं म्हणत मुनगंटीवार यांनी हे आरोप फेटाळून लावले. तसेच, ‘येत्या ९ तारखेच्या आत महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल’, असा विश्वस देखील त्यांनी व्यक्त केला.

‘आम्ही सगळे एकत्रच प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्र्यांच्याही याच सूचना आहेत की आपल्याला महायुतीमध्येच जायचं आहे. सगळेजण शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहोत. नाराजी आहे, पण आम्ही कधीच एकत्र येणार नाही इतका दुरावा आलेला नाही. त्यामुळे आमची महायुतीचीच चर्चा सुरू आहे’, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘हा तर धमकीचा पाद्रा पावटा’, उद्धव ठाकरेंची भाजपवर परखड टीका!

‘अग्रलेख लिहून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होऊ नये असं करण्याचं काही कारण नाही. टीकेनं जग जिंकता आलं असतं, तर आम्हीही आमचा पेपर आणून टीका केली असती. पण आम्ही पूर्णपणे प्रेमानेच प्रयत्न करत आहोत. पण शिवसेनेतले एक नेते नाराज आहेत. शिवसेनेचे इतर पक्षनेतेतर आमच्याशी चांगलेच वागत आहेत’, असा टोला यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -