घरमहाराष्ट्रकाँग्रेसवर दोन मतदारसंघातील उमेदवार शेवटच्या क्षणी बदलण्याची नामुष्की

काँग्रेसवर दोन मतदारसंघातील उमेदवार शेवटच्या क्षणी बदलण्याची नामुष्की

Subscribe

उमेदवार निवडीत शेवटच्या क्षणापर्यंत घोळ घालण्याचा बदलौकिक काँग्रेसने विधानसभेलाही कायम राहिला. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसवर दोन मतदारसंघातील उमेदवार शेवटच्या क्षणी बदलण्याची नामुष्की ओढावली. काँग्रेसने १५० उमेदवार जाहीर केले असून आतापर्यंत त्यातील चार उमेदवार बदलण्यात आले आहेत. काँग्रेसने याआधी कुडाळमधून हेमंत उर्फ काका कुडाळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याऐवजी आता चेतन मोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली. सिल्लोडमध्ये प्रभाकर पालोदकर यांची उमेदवारी रद्द करून तेथे कैसर आझाद यांना तिकीट देण्यात आले आहे. तर नाशिक मध्य विधानसभा मतदरासंघात शाहू खैरे यांच्या उमेदवारीवर फुली मारून काँग्रेसने हेमलता निनाद पाटील यांना उमेदवारी दिली आहे. नंदूरबारमध्ये मोहन पवन सिंग यांची जाहीर झालेली उमेदवारी मागे घेऊन तेथे उदयसिंग पाडवी यांना तिकीट दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आशिष देशमुख

दरम्यान, काँग्रेसने मुख्यमंत्री, भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आशिष देशमुख यांना नागपूर दक्षिण मध्य मतदरसंघातून उमेदवारी दिली आहे. आशिष हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर काटोलमधून निवडून आले होते. भाजप आमदार असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. शेवटी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. काँग्रेसने त्यांना आता थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मैदानात उतरवले आहे.

- Advertisement -

नाना पटोले यांना साकोलीतून उमेदवारी

काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांना साकोलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी गुरूवारी रात्री पटोलेंच्या उमेदवारीची घोषणा केली.

शेवटच्या क्षणी जाहीर झालेले उमेदवार

  • मोहनराव हंबार्डे (नांदेड दक्षिण)
  • भाऊसाहेब पाटील (मुखेड)
  • योगेश शंकर नम (पालघर)
  • संतोष शेट्टी (भिवंडी पूर्व)
  • सुरेश जगन्नाथ थोरात (शिर्डी)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -