घरमहाराष्ट्रबाळासाहेबांनी मला शिवसैनिकांवर लादलं नाही, शिवसैनिकांनी मला स्वीकारलं - उद्धव ठाकरे

बाळासाहेबांनी मला शिवसैनिकांवर लादलं नाही, शिवसैनिकांनी मला स्वीकारलं – उद्धव ठाकरे

Subscribe

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे गेल्या दोन महिन्यांपासून तयारीला लागले आहेत. जनआशीर्वाद यात्रेमार्फत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला. यावेळी त्यांनी शिवसेनेचा मोठ्या जोशात प्रचार केला. अखेर मंगळवारी शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत आदित्य ठाकरे यांचे नाव आले. मंगळवारी शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. यावर उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना शिवसैनिकांनी स्वीकारलं असल्याचे स्पष्ट केलं. ‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांवर उद्धव माझा मुलगा आहे, असं लादलं नाही. माझ्या कामांवरुन शिवसैनिकांनी मला स्वीकारलं. तसंच आदित्यचे काम पाहुन शिवसैनिकांनी आदित्यला स्वीकारले आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा शिवसेनेत प्रवेश

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘माझ्या बाबतीत मला शिवसेना प्रमुखांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की उद्धव तुला जर या क्षेत्रात पुढे जायचे असेल तर तू माझा मुलगा म्हणून मी शिवसैनिकांवर लादणार नाही आणि तू माझा मुलगा म्हणून मी तुला अडवणारही नाही. तू तुझं काम कर. शिवसैनिकांनी तुला स्वीकारलं तर तू जरुर पुढे जा. आज मला एक समाधान आहे. आदित्य मनापासून, जिद्दीने आणि चिकीटीने काम करतोय. माझ्याही पेक्षा जास्त मेहनत करतोय आणि शिवसैनिकांनी त्याला स्वीकारलेलं आहे. म्हणूनच काल त्याच्या उमेदवारीची घोषणा करण्याच्या कार्यक्रमाला मी गेलो नव्हतो. कारण मला कोणतेही काम दडपणाखाली होऊ द्यायचं नव्हतं. आनंदाने आणि प्रेमाने शिवसैनिकांनी त्याला स्वीकारलं आहे. आता त्याची पुढची जबाबदारी ही शिवसैनिकांची आहे. आमच्या ठाकरे घराण्याची परंपरा ही सेवा करण्याची आहे. ही परंपरा पुढची पिढी देखील सुरु ठेवेल याचा मला आनंद आहे.’ त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे देखील आभार मानले.

‘मी हे केलं म्हणून तुम्ही ते करा, असं मी सांगणार नाही’

आदित्य ठाकरे यांची निवड बिनविरोध व्हावा, असा प्रयत्न शिवसेनेचे होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ज्या वेळेला अशा काही गोष्टी झाल्या त्यावेळी शिवसेनेने विरोध केलेला नाही. पण मी कधी कुणाला सांगणार नाही की, मी हे केलं म्हणून तुम्ही ते करा. त्यामुळे प्रत्येकाची वेगळी वृत्ती असू शकते. महाराष्ट्राच्या विकासासाठी आदित्य निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे. साहजिकच आहे, युवकांचे स्वप्न असते. नेहमी आपण युवकांना स्वप्न दाखवत पुढे नेतो. पण नुसतं स्वप्न नाही तर आता तमाम युवकांनी पुढे येऊन राजकारण हातामध्ये घ्यायला हवं.’ त्याचबरोबर या पिढीनं राजकारण आणि सरकार हातामध्ये घेऊन देशाचा विकास करायला हवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -