घरमहाराष्ट्रसरकार स्थापन करण्यास शिवसेना अनुकूलच, आमचा काही अडथळा नाही - संजय राऊत

सरकार स्थापन करण्यास शिवसेना अनुकूलच, आमचा काही अडथळा नाही – संजय राऊत

Subscribe

शिवसेनेच्या शिष्टमंडळांने घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट.. मात्र राजकीय भाष्य करणे टाळले.

महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेत उशीर होत असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसल्यामुळे सत्ता स्थापनेस उशीर होत होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात होती. राज्यपालांची भेट झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सरकार स्थापनेसाठी शिवसेना अनुकूल आहे. तरिही सत्ता स्थापनेत उशीर का होतोय? याची कल्पना नाही. सत्ता स्थापनेत आमचा कोणताही अडथळा नाही. सर्वात मोठ्या पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांना भेटून करायला हवा.”

राज्यपालांना स्व. बाळासाहेबांचे फटकारे आवडले

संजय राऊत म्हणाले की, राज्यपालांशी महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर चर्चा झाली, हे सत्य आहे. मात्र ही आमची सदिच्छा भेट होती. राज्यपालांना स्व. बाळासाहेब ठाकरेंचे ‘फटकारे’ हे पुस्तक त्यांना भेट दिले. तसेच उद्धवजींचे ‘पाहावा विठ्ठल’ आणि ‘महाराष्ट्र माझा’ हे दोन पुस्तके भेट दिली. तीनही पुस्तके राज्यपालांना आवडली. यासोबतच देशाची आणि राज्याची वर्तमान परिस्थितीवर देखील आम्ही चर्चा केली.

- Advertisement -

मात्र सत्ता स्थापनेच्या दाव्यावर संजय राऊत यांनी भाष्य करणे टाळले. राजभवन ही बिगर राजकीय जागा आहे, राज्यपाल हे कोणत्याही एका पक्षाचे नेते नसतात. त्यामुळे राजभवनात कोणतेही राजकीय वक्तव्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भगत सिंह कोश्यारी हे कायद्याची उत्तम जाण असणारे खूप अनुभवी असे राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले आहेत, याची अनुभूती आम्हाला राज्यपालांशी बोलताना आली, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -