घरहिवाळी अधिवेशन 2022'तो' तारांकीत प्रश्न भाजप आमदारांचा; खटाटोप फडणवींसाच्या मुख्यमंत्रीपदासाठी?

‘तो’ तारांकीत प्रश्न भाजप आमदारांचा; खटाटोप फडणवींसाच्या मुख्यमंत्रीपदासाठी?

Subscribe

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गरिबांना घरे देण्यासाठी शिंदे यांनी २०१९ मध्ये नगर विकास मंत्री असताना नागपूर प्रन्यास सुधारचे १६ भूखंड अवघ्या दोन कोटी रुपयांना बिल्डरला दिले. मुळात या भूखंडांची किंमत ८० कोटी रुपये होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही  सरकारवर ताशेरे ओढले.

नागपूरः एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन हटविण्यासाठी महाविकास आघाडीने विधानसभेत घातलेल्या गोंधळाची पायेमुळे रचण्याचे काम भाजपचं करत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे यांच्याबाबतची भाजपच्या मनातील खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गरिबांना घरे देण्यासाठी शिंदे यांनी २०१९ मध्ये नगर विकास मंत्री असताना नागपूर प्रन्यास सुधारचे १६ भूखंड अवघ्या दोन कोटी रुपयांना बिल्डरला दिले. मुळात या भूखंडांची किंमत ८० कोटी रुपये होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही सरकारवर ताशेरे ओढले. न्यायालयाने फटकारल्याने माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु झाली. महाविकास आघाडीने मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. तर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची बाजू सावरुन धरली.

- Advertisement -

प्रत्यक्षात या मुद्दयाची चौकशी व्हावी यासाठी भाजपने तीन महिनेआधीच तयारी केली होती. भाजपच्या तीन आमदारांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी ४५ दिवसआधीच तारांकीत प्रश्न टाकला होता ही बाब बुधवारी उजेडात आली. महत्त्वाचे म्हणजे फडणवीस हे मी प्रदेशाध्यक्ष असतानाच मुख्यमंत्री व्हावेत, अशी ईच्छा चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवली होती. त्यांच्यासह तीन आमदारांनी हा तारांकीत प्रश्न टाकला आहे. भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि नागोराव गाणार यांनीही हा तारांकीत प्रश्न टाकला होता. हे दोन्ही आमदार विर्दभातलेच आहेत.

शिंदे यांनी शिवसेनेसोबत काडीमोड घेत स्वतंत्र गट स्थापन केला. या गटाने भाजपला पाठिंबा देत महाविकास आघाडीचे सरकार पाडले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे सरकारला भाजप बाहेरुन पाठिंबा देईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र पक्षश्रेष्ठींचे आदेश आले आणि फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री पद स्विकारले. तेव्हापासून भाजपच्या मनात शिंदे यांच्याबाबत खदखद होतीच. ही खदखद सर्वात पहिल्यांदा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात बोलून दाखवली होती. मनावर दगड ठेवून शिंदे यांना मुख्यमंत्री केले, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. यावरुन एकच खळबळ उडाली होती.

- Advertisement -

त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरु असताना बावनकुळे यांनी फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी ईच्छा बोलून दाखवली होती. त्यात शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना घेतलेल्या निर्णयाची चौकशी व्हावी यासाठी भाजप आमदारांनीच तारांकीत प्रश्न केला. त्यामुळे शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी महाविकास आघाडीसोबतच भाजपही तयारी करत असल्याचेही समोर आले आहे.

 

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -