घरमहाराष्ट्रजयंत पाटलांची ती चूक मान्य...; अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी

जयंत पाटलांची ती चूक मान्य…; अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी

Subscribe

विधानसभेच्या अध्यक्षांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबन करण्याचा ठराव माडंला. या ठरावानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जयंत पाटलांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच काही चुकलं तर ती चुक मान्य करून पुढे गेलं तर त्यातून एक चांगल वातावरण तयार होईल असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, माझी सभागृहाला विनंती आहे की, तुम्ही बहुमताने निर्णय घेतला आहे. शेवटी तो निर्णय शिरसावंद आहे. पण विरोधी पक्ष या नात्याने जयंत पाटील यांच्याकडून जे काही घडलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी दिलगिरी निलंबन मागे घ्यावं म्हणून करत नाही. परंतु राज्यामध्ये आमच्याकडून एक चांगला मेसेज जावा, महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आहे की ज्यावेळी काही चुकलं तर ती चुक मान्य करून पुढे गेलं तर त्यातून एक चांगल वातावरण तयार व्हावं, आज हे वातावरण तयार होणार नाही याची जाणीव आहे, अशी भावना अजित पवारांनी व्यक्त केली.

- Advertisement -

अध्यक्ष पदावरील व्यक्तीबद्दल आदराची भावना आहे. ती भावना पुढेही चांगल्या पद्धतीने ठेवू असा विश्वास अजित पवारांना व्यक्त केला, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या बाबतीत काही गैर करून घेऊन नका अशी विनंतीही अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार म्हणाले की, गेली अनेक वर्षे सभागृहात काम करतोय, पण कोणाकडूनचं सत्ताधारी विरोधी पक्षाकडून अशाप्रकारचं वक्तव्य अजानतेपणाने देखील होऊन नये. जे घडलं ते घडायला नको होतं, हे घडत असताना विधिमंडळाचे प्रमुख नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अनेक मान्यवरांना विनंती केली की, यातून मार्ग काढावा. कुणाकडून असा काही शब्द अजानतेपणाने जातो ज्यानंतर सर्वांच्या लक्षात येतं की जे घडलं ते बरोबर नाही.

- Advertisement -

दिलीप वळसे पाटील, देवेंद्र फडणवीस म्हणतात की, एखाद्याला भूक लागली की काही झालं तर काही गोष्टी घडतात, त्याच्या खोलात जात नाही. परंतु एक अपेक्षा होती की, मी जरी विरोधी पक्षाचा नेता असलो तरी मी ज्या पक्षाचं नेतृत्त्व करतो त्याचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळाचे गटनेते म्हणून जयंत पाटील काम करत आहेत, असही अजित पवार म्हणाले.

आज सकाळपासून जेव्हा सभागृहात कामकाज चालू असताना जसं सत्ताधारी पक्षाला संधी मिळते तशी विरोधीपक्षालाही काहीप्रमाणामध्ये संधी मिळाली तर त्यातून मार्ग निघतो, काहीवेळा खटके उडतात,अरेला का रे होतं, असही अजित पवार म्हणाले.


हेच का ‘जनसामान्यांचं’ भरकटलेलं दिशाहीन सरकार?, रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -