घरदेश-विदेशCBI वाद : आलोक वर्मांना हटवलं; CVCमध्ये मतभेद

CBI वाद : आलोक वर्मांना हटवलं; CVCमध्ये मतभेद

Subscribe

अलोक वर्मा यांच्या बदलीवरून आता सीव्हीसीमधील वाद समोर आले आहेत.

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्याकडे पुन्हा एकदा पदभार द्या, असे आदेश न्यायालयानं दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची बदली करण्यात आली. सीव्हीसीनं ही कारवाई केली. दरम्यान सीबीआयच्या संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आलोक वर्मा यांनी नागेश्वर राव यांनी केलेल्या सर्व बदल्या रद्द केल्या होता. आलोक वर्मा यांच्याबाबत कोर्टाचा निर्णय हा केंद्र सरकारला मोठी चपराक होती. दरम्यान पुन्हा पदभार स्वीकारल्यानंतर आलोक वर्मा यांची बदली करण्यात आली. यावेळी सीव्हीसीमधील वाद देखील समोर आले. सीव्हीसीमध्ये मुख्य न्यायधीशांच्या वतीनं बाजू मांडणारे न्यायमूर्ती सिक्री यांनी आलोक वर्मा यांच्यावर आरोप असल्याचा उल्लेख केला. त्याला आक्षेप घेत लोकसभेतील काँग्रसचे गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी कोणते आरोप? असा सवाल केला. त्यानंतर मात्र सीव्हीसीमधील मतभेद समोर आले.

पण, सीव्हीसीच्या बैठकीनंतर देखील आलोक वर्मा यांची बदली रोखता आली नाही. सीव्हीसीच्या बैठकीमध्ये मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही. आलोक वर्मा यांची बदली करण्यासाठी समितीकडे कोणतेही ठोस आरोप नाहीत असा युक्तिवाद मल्लिकार्जून खर्गे यांनी केला. आलोक वर्मा यांच्या जागी आता नागेश्वर राव यांच्याकडे सीबीआयच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये ट्विटरवॉर देखील रंगले.

- Advertisement -


काय आहे वाद

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विषेश संचालक राकेश अस्थाना यांच्यात लाचखोरीवरून असलेले वाद पुढे आले. त्यानंतर सरकारनं हस्तक्षेप करत दोघांना देखील सक्तीच्या रजेवर पाठवलं. पण, आलोक वर्मा यांनी सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. अखेर न्यायालयानं आलोक वर्मा यांना सीबीआय संचालकपदी कायम ठेवलं.

वाचा – अलोक वर्मांनी घेतला CBI संचालकपदाचा पदभार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -