Live Update: गोव्यात आज दिवसभरात ४०७ नवीन कोरोनाबाधितांची वाढ!

Live Update News

राज्यात गेल्या २४ तासांत २२ हजार ५४३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ६० हजार ३०८ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २९ हजार ५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


गोव्यात आज ४०७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गोव्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २४ हजार ५९२वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत २९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १९ हजार १२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५ हजार १७३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती गोव्याच्या आरोग्य विभागाने दिली.


सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आणि सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करत हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनापूर्वी झालेल्या आरोग्य तपासणीत पाच खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत.


अभिनेता कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोलीने राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.


अँटीजन टेस्टमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सविस्तर वाचा 


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी अभिनेती कंगना रनौत मुंबईतील राजभवनात पोहोचली आहे. यादरम्यान कंगना बीएमसीच्या कारवाईविरोधात राज्यपालांशी चर्चा करणार आहे.


बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी रवाना झाली आहे. थोड्याच वेळात कंगना राज्यपालांची भेट घेणार आहे.


पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका. काही लोकं मास्क चुकीच्या पद्धतीनं घालतात. काही गोष्टी आपण जबाबदारीनं पाळल्या पाहिजेत – मुख्यमंत्री


कोरोनाचं संकट टळलं नाही, वाढतच आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्याचा प्रयत्न सुरब. मास्क लावा, हात धुवा हे महत्त्वाच सुत्रं. १५ सप्टेंबरपासून एक मोहिम राबवणार.  राज्यातील प्रत्येक घरात चौकशी केली जाईल. शेतकऱ्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज. कारण शेतकरी वर्क फॉर्म होम करू शकत नाही. शेकऱ्यांसाठी विकेल ते पिकेल अशी योजना.


सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक, सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढत केला निषेध, तिरडीवर पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांचे फोटो, अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात


माजी नौदल अधिकाऱ्यांना मारहाणप्रकरणी रामदास आठवले केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.


मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह मिम्स शेअर करत कंगना रनौतनं आता मराठीत ट्वीट केलं आहे. कंगनानं एक चित्र शेअर केलंय. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई दिसत आहेत. यात राणी लक्ष्मीबाईंच्या रुपात कंगना दिसत आहे. तर या चित्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रावणाची उपमा दिली आहे. त्यात त्यांना दहा तोंडं दाखवली असून मागे जेसीबी दाखवला आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा  एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये काल रात्री अकराच्या सुमारास त्यांना दाखल केलं. श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना १८ ऑगस्टला दिल्लीतील एम्समध्ये दाखल केलं होतं. अमित शहा यांना बर्‍याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे.


देशात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाच्या ९७ हजार ५७० रुग्णांची भर पडली असून ही आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन वाढ आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या ४६ लाख ५९ हजार ९८४ वर पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात १,२०१ मृत्यू झाले असून मृतांची एकूण संख्या ७७ हजार ४७२ वर गेली आहे.