काश्मिरच्या पुलवामा सेक्टरमध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

Mumbai
One terrorist has been gunned down
पुलवामामध्ये चकमक

जम्मू–काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती या सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत – पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या तणावामुळे जम्मूतील अनेक ठिकाणी अशा लहान-मोठ्या चकमकी सुरू असून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली.

काश्मिरच्या पुलवामा सेक्टरमध्ये जोरदार चकमक सुरू असून ही चकमक सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये होत आहे. या चकमकीमध्ये लष्कराने दोन-तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. पुलवामा सेक्टरमध्ये सुरू असलेल्या चकमकीत या ठिकाणी दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू असून येथे सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

एका दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामा जिल्ह्यात त्रालच्या जंगलात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असताना नागबालच्या जंगलामध्ये जवानांनी दहशतवाद्यांना घेरले असून एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ४२ राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी आहेत. जंगल भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.