घरदेश-विदेशजीडीपीचे आकडे धोक्याची घंटा, अर्थव्यवस्था आणखी रसातळाला जाणार; रघुराम राजन यांचा इशारा

जीडीपीचे आकडे धोक्याची घंटा, अर्थव्यवस्था आणखी रसातळाला जाणार; रघुराम राजन यांचा इशारा

Subscribe

देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी चिंता व्यक्त केली. आताच्या परिसिथितीला नीट हाताळलं नाही तर अर्थव्यवस्थेची स्थिती अधिक बिकट होऊ शकते, असा इशारा रघुराम राजन यांनी दिला आहे. रघुराम राजन म्हणाले की, २०२०-२१ मधील पहिल्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी अर्थव्यवस्थेच्या विध्वंसाचा गजर आहे. त्यामुळे सरकारने सतर्क राहिले पाहिजे. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या लिंक्डइन पेजवरील पोस्टमध्ये ही सूचना केली.

राजन यांनी आपल्या लिंक्डइन पेजवर एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आर्थिक वाढीतील एवढी मोठी घसरण आपल्या सर्वांसाठी एक चेतावणी आहे. भारताचा जीडीपी २३.९ टक्क्यांनी घसरला. (असंघटित क्षेत्रातील आकडेवारीनंतर अजून घसरु शकते). दुसरीकडे, कोविड-१९ पासून सर्वाधिक प्रभावित देश इटलीमध्ये १२.४ टक्के आणि अमेरिकेत ९.५ टक्क्यांनी घसरली आहे.

- Advertisement -

सरकारची रणनीती आत्मघाती

राजन म्हणाले की, सरकार भविष्यात प्रोत्साहन पॅकेजेस देण्यासाठी संसाधने वाचवण्याच्या धोरणाचे अनुसरण करीत आहे, जी आत्महत्या आहे. सरकार असा विचार करीत आहे की विषाणू नियंत्रित झाल्यानंतर ते मदत पॅकेजेस देतील, परंतु परिस्थितीची गंभीरतेला कमी लेखत आहेत. अर्थव्यवस्थेवर याचा वाईट परिणाम होणार आहे.

अर्थव्यवस्थेकडे एखाद्या रूग्णासारखे पहा

रघुराम राजन म्हणाले आहेत की जर तुम्ही एखाद्या रूग्णाप्रमाणे अर्थव्यवस्थेकडे पाहिलं तर त्यासाठी सतत उपचारांची आवश्यकता असते. मदत पॅकेजेसशिवाय लोक अन्न सोडून देतील, मुलांना शाळेतून काढऊन टाकतील व त्यांना कामावर किंवा भीक मागण्यासाठी पाठवतील, कर्जासाठी सोनं तारण ठएवतील, ईएमआय आणि घरभाडे वाढत जाईल. त्याचप्रमाणे, लहान आणि मध्यम कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना पगार देण्यास सक्षम होणार नाहीत, त्यांचे कर्ज वाढेल आणि अखेरीस त्या कंपन्या बंद होतील. विषाणू नियंत्रणाखाली येईपर्यंत ही अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल. सरकारकडे तातडीने मदत पॅकेजची मागणी केली आणि त्याची रक्कम वाढवण्याची देखील मागणी रघुराम राजन यांनी केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -