देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांपेक्षा अधिक

नव्या रुग्णांपेक्षा नव्या बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाण दररोज वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९३टक्क्यांपर्यंत वर आला आहे. एकूण राष्ट्रीय दर ९३.०५ टक्क्यांइतका आहे.

first time mumbai patient doubling rate over century has passed

नव्या रुग्णांपेक्षा नव्या बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाण दररोज वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९३टक्क्यांपर्यंत वर आला आहे. एकूण राष्ट्रीय दर ९३.०५ टक्क्यांइतका आहे. नव्या रूग्णसंख्येचा आलेख खाली येत असून लोकसंख्या कोविडच्या पार्श्वभूमीवर योग्य काळजी घेण्याबरोबरच केंद्र सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असल्याचे दिसत आहे. गेले ५ आठवडे नवीन रूग्णांची सरासरी संख्या कमी होत आहे.

बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८१,६३,५७२ इतकी आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्यातील अंतर हळूहळू वाढत असून आता ते ७६,८२,८५३ इतके झाले आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांपर्यंत वर आला आहे. एकूण राष्ट्रीय दर ९३.०५ टक्के इतका आहे. सतत चौथ्या दिवशी ५ लाखांपेक्षा कमी रुग्ण संख्या नोंदवत भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या ४,८०,७१९ इतकी कमी झाली आहे. पॉझिटीव्ह रूग्ण आणि सक्रीय रुग्ण यांचे प्रमाण कमी होऊन ते आता ५.४८ टक्के इतके झाले आहे. बरे झालेल्या रूग्णांपैकी ७५.३८ टक्के रूग्ण १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील आहेत. २४ तासांत दिल्लीत सर्वाधिक रूग्ण बरे झाले असून, रुग्णांची संख्या ६,४९८ इतकी आहे. केरळमध्ये ६,२०१ रुग्ण दररोज बरे होत असून महाराष्ट्रात ४,५४३ रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत रूग्णसंख्या वाढून त्यात ७,८०२ अधिक रुग्णांची भर पडली आहे. केरळमध्ये नव्या ५,८०४ रूग्णांची नोंद झाली आहे तर महाराष्ट्रात काल ४,१३२ रुग्णांची नोंद होऊन तो तिसर्‍या स्थानावर आहे.