घरमनोरंजनकबिर सिंग बघून त्याने केला एअर होस्टेसचा खून!

कबिर सिंग बघून त्याने केला एअर होस्टेसचा खून!

Subscribe

अश्वनी कुमार उर्फ टिकटॉक स्टार जॉनी दादाने कबीर सिंह पासून प्रेरीत होउन एका मुलीची हत्या केली. दिगर्शक संदीप रेड्डी वांगा म्हणतात की त्यांचा चित्रपट खून करायला प्रवृत्त करत नाही.

शाहीद कपूरची मुख्य भुमिका असणाऱ्या कबीर सिंग चित्रपटावर बऱ्याच टिका झाल्या. या वर्षाचा सर्वाधिक कमावणारा चित्रपट जरी असला तरी यातील कबीर सिंग या पात्राचा खोल परिणाम प्रेक्षकांवर झाला. नुकताच याचा प्रत्यय आला आहे. चक्क एका व्यक्तीने कबीर सिंग स्टाईलने एक खून केला आहे. टिक टॉक वर प्रसिद्ध असलेल्या जॉनी दादा उर्फ अश्वनी कुमारने एका फ्लाइट अटेंडंट नितिका शर्माचा खून केला आहे. या आधीच हा ३० वर्षीय अश्वीन कुमार  तीन खून प्रकरणात मुख्य संशयित आरोपी होता. कुमार टिक टॉकवर ‘विल्लन’ म्हणून विडीओ अपलोड करायचा.

जेव्हा कुमारला कळलं की निकिताचं एका दूसऱ्या व्यक्तिशी लग्न होणार आहे तेव्हा त्याने तिचा खून केला. पोलीसांपासून पळ काढत असताना कुमारने स्व:ताला गोळी मारून आत्महत्या केली. यानंतर जेव्हा पोलीसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा कुमार शाहीदच्या कबीर सिंघ चित्रपटापासून फार प्रभावित होता आणि अनेकदा त्याचे फोटो व डायलॉग्स सोशल मीडिया वर पोस्ट करायचा.

- Advertisement -

दिगर्शक संदीप रेड्डी वांगा म्हणाले,

या पुर्ण प्रकरणाबद्दल दिगर्शक संदीप रेड्डी वांगा यांना पिडीत मुलगी व तिच्या परिवाराबद्दल दुख: व्यक्त केलं आहे.  या प्रकरणाचं कबीर सिंघशी काही संबध नाही कारण चित्रपटाची कथा किंव्हा चित्रपटातला नायक हे कोणीही, खून करायला प्रवृत्त करत नाही, ते हे ही म्हणाले की अश्वनी सारख्या लोकांना मानसिक त्रास असतो म्हणून ते अशी कृत्य करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -