‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या रिमेकमध्ये परिणीती मुख्य भुमिकेत

mumbai
pariniti chopra

२०१५ मध्ये पॉला ह़ॉकिंस यांनी आपलं पहिलं पुस्तक लिहीलं होतं. ज्याच नाव होतं,’द गर्ल ऑन द ट्रेन’. २०१६ मध्ये हॉलिवूड फिल्ममेकर टेट टेलर यांनी या पुस्तकावर एक चित्रपट बनवला. हा चित्रपट सुपर डुप हिट ठरला. लवकरच बॉलिवूडमध्ये हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे, आणि चित्रपटात मुख्या भुमिकेत अभिनेत्री परिणीती चोप्रा दिसेल.

जुलै महिन्यापासून या चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात होईल. रिभु दासगुप्ता या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाच्या शुटींगची सुरूवात अमेरीकेत होईल. त्यानंतर वेगवेगळ्या लोकेशन्सवर चित्रपट पुर्ण केला जाईल. २०२० ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या हॉलिवूडपटात अभिनेत्री एमिली ब्लंटने रैचल वॉटसन नावाच्या महिलेची भुमिका निभावली होती. घटस्फोट घतलेली रैचल दारूच्या आहारी जाते. त्यानंतर रैचल एक दिवस ट्रेन मधून प्रवास करता. तीचा हा ट्रेनचा प्रवास म्हणजे ‘द गर्ल ऑन द ट्रेन’. आता हिंदीमध्ये हा रोल परिणीता करताना दिसणार आहे. अद्याप या चित्रपटातील इतर कॅरेक्टरविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.

मार्चमध्ये परिणीताची केसरी फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यात तिच्याबरोबर अक्षय कुमार दिसला होता. १०० कोटींच्या वर या चित्रपटाने गल्ला जमवाला. याच बरोबर लवकरच परिणीता सिध्दार्थ मल्होत्राबरोबर ‘जबरिया जोडी’ आणि अर्जुन कपूर बरोबर ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटात दिसेल.