राशीभविष्य रविवार 22 मार्च ते शनिवार 28 मार्च 2020

Mumbai
Horoscope 44
राशीभविष्य

मेष : मकर राशीत मंगळ, वृषभ राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मत मांडताना बेसावध राहू नका. धंद्यात वाढ करता येईल. ओळखी वाढतील. नोकरीत तुमच्या परीक्षेचा कालावधी ठरू शकतो. घरातील समस्या कमी होतील. आप्तेष्ठांच्या भेटी होतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप होतील. प्रकरण वाढू देऊ नका. मार्ग मिळेल. लोकांचे सहकार्य मिळेल. कला-क्रीडा विभागात आत्मविश्वास वाढेल. परिचयाचा फायदा करून घेता येईल. कोर्टाच्या कामात तत्परता दाखवा. नम्र रहा. शोध मोहिमेत सहकारी मदत करतील. विद्यार्थी वर्गाने अभ्यास करावा. एकाग्र व्हावे. यश मिळेल. शुभ दि. २२,२३

वृषभ : मकर राशीत मंगळ, तुमच्या राशीत शुक्र प्रवेश होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी खूशखबर मिळेल. धंद्यात काम मिळेल. हिशोबात चूक करू नका. नोकरीत कामाचा व्याप राहील; पण तुम्ही पुढे रहाल. राजकीय-सामाजिक कार्यात विरोधक, जवळचे लोक नाहक अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. प्रतिष्ठा राहील. तुम्ही तटस्थ रहा. घरातील कामे होण्यास विलंब होऊ शकतो. खर्च वाढेल. खाण्याची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाता येईल. कोर्ट केसमध्ये फसगत टाळा. शोेध मोहीम प्रयत्नाने यशस्वी करावी लागेल. विद्यार्थी वर्गाने आळस न करता अभ्यास करावा. यश खेचून आणा. शुभ दि. २३, २४

मिथुन ः मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात जम बसवता येईल. धावपळ वाढेल. घरगुती काम रेंगाळण्याची शक्यता आहे. वेळेला महत्त्व द्या. प्रयत्नाने यश मिळवता येईल. मागिल येणे वसूल करा. नोकरीत खूशखबर मिळेल. शुभ कार्य आरंभ करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात रागावर ताबा ठेवा. प्रवासात, दौर्‍यात काळजी घ्या. प्रतिष्ठा मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकीक मिळेल. किरकोळ दुखापत संभवते. कोर्टाच्या कामात यश मिळेल. शोध मोेहीम गाजेल. गुप्त कारवाया तुम्ही ओळखाल. विद्यार्थी वर्गाने खाण्याची मौज जास्त न करता अभ्यास करावा. शुभ दि. 23, 24

कर्क : मकर राशीत मंगळ, वृषभ राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात सुधारणा करू शकाल. गुढीपाडव्याच्या दिवशी चांगली घटना घडेल. नोकरीत अधिकारी वर्गाला मदत करू शकाल. तुमचा प्रभाव वाढेल. संसारात किरकोळ समस्या येईल. रागावर ताबा ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्याबद्दल झालेला गैरसमज दूर करता येईल. वाटाघाटीच्या प्रश्नावर चर्चा करता येईल. शोध मोेहीम यसश्वी कराल. कला क्षेत्रात विशेष मन रमेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नावलौकिक तुमच्या कामात मिळेल. विद्यार्थी वर्गाने संपूर्ण अभ्यासावर लक्ष द्यावे, तरच यश उत्तम मिळेल. शुभ दि. २४, २५

सिंह : मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश या सप्ताहात होत आहे. धंद्यात नवे काम लवकर मिळवण्याचा प्रयत्न करा. मागिल वसुली करून घ्या. नोकरीत अधिकारी वर्गाच्या धाकाखाली काम करावे लागेल. कामात चूक होईल. राजकीय-सामाजिक कार्यातला तणाव कमी करता येईल. प्रतिष्ठा सांभाळता येईल. रागावर ताबा ठेवा. लोकसंग्रह वाढवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती, प्रसिद्धी होईल. कोर्ट केस प्रभावी ठरवता येईल. शोध मोहिमेत धाडसी पाऊल उचलावे लागेल. विद्यार्थी वर्गाने मोठ्या व्यक्तीचा सल्ला मानावा. कुठेही अहंकार ठेऊ नका. सहनशीलता ठेवा. शुभ दि. 22,23

कन्या ः मकर राशीत मंगळ, वृषभ राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात जे मिळेल ते काम हाती घ्या. मिळते-जुळते धोरण ठेवा. वाद वाढवू नका. संसारात खर्च वाढेल. गैरसमज होईल. नोकरीत काम वाढेल. कामाचा गोंधळ होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. उतावळेपणा दिसू देऊ नका. योग्य विचाराने कोणतेही विधान करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. पोटात उष्णतेचा त्रास संभवतो. शोध मोहिमेत दगदग वाढेल. कोर्टाच्या कामात योग्य शब्द वापरा. परीक्षेसाठी मुलांनी आळस करू नये, तरच प्रगती होईल. शुभ दि. २४,2५

तूळ ः मकरेत मंगळ, वृषभ राशीत शुक्र प्रवेश होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. भावनेच्या आहारी जाऊ नका. तटस्थपणे तुमचे काम करा. नोकरीत कामाची गर्दी होईल. अपरिचित व्यक्तीशी जपून, नेमकेच बोला. व्यवहारात फसगत होऊ शकते. संसारात क्षुल्लक तणाव होईल. खर्च वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न होईल. जवळचे लोक छोट्या गोष्टींचा बाऊ करतील. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट घ्या. मोहाला बळी पडू नका. कोर्ट केस हुशारीने लढा. शोध मोहिमेत दिशाहीन व्हाल. परीक्षेसाठी जय्यत तयारी करा. शुभ दि. २२,२३

वृश्चिक ः मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश होत आहे. धंद्यात आशादायक परिस्थिती दिसेल. मोठ्या लोकांकडून आश्वासन मिळेल. विलंबाने धंद्यात यश येईल. नोकरीत काम वाढेल. तुमच्या मनाविरुद्ध काम घ्यावे लागेल. संसारातील समस्या सोडवण्यात वेळ जाईल. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रेरणादायी घटना घडेल. प्रवासात घाई करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात गुप्त हितशत्रू कारवाया करतील. प्रतिष्ठेवर टीका होईल. प्रभाव मात्र तुमचाच राहील. स्पर्धा जिंकणे सोपे नाही. कोर्टाच्या कामात मुद्दा नीट समजून घ्या. परीक्षेसाठी अभ्यासाला आळस करू नये. शुभ दि. 24, 25

धनु ः- मकर राशीत मंगळ, वृषभ राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यातील कामे लवकर पूर्ण करा. नवे काम घेऊन ठेवा. वसुलीचा प्रयत्न करा. घरातील कामे करून घ्या. नोकरीत जबाबदारी वाढेल. बदलीची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक कार्यात ठरविलेले काम करून घेण्याची जिद्द ठेवा. रागावर काबू ठेवा. खर्च वाढेल. डोळ्यांची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टाच्या कामात क्षुल्लक अडचण येऊ शकते. शोध मोहिमेत प्रगती कराल. विद्यार्थी वर्गाने चांगल्या संगतीत रहावे. अभ्यास करावा. यश मिळवाल. शुभ दि. 22, 25

मकर ः- तुमच्याच राशीत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश होत आहे. धंद्यात वाढ होईल. दुसर्‍याचा विचार ऐकून घ्या. त्यावर योग्य ती चर्चाही करता येईल. मागिल थकबाकी वसूल करा. गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ कार्य आरंभ करता येईल. नोकरीत प्रगती होईल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनाबद्ध कार्यक्रम करा. दौर्‍यात यश मिळेल. जनहित कौल तुम्हाला मिळेल. संसारात तणाव, चिंता कमी होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची नवीन संधी मिळेल. कोर्ट केस यशस्वी होईल. शोध मोेहिमेत तुमचे कौतुक होईल. परीक्षेसाठी अभ्यासाची तयारी भरपूर करा. यश मिळेल. शुभ दि. 24,25

कुंभ ः- या सप्ताहात मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ करताना क्षुल्लक अडचण येईल. वाद वाढवू नका. प्रवासात सावध रहा. नोकरीत तुमच्याकडून महत्त्वाचे काम करून घेतले जाईल. प्रतिष्ठा वाढेल. घरातील व्यक्तींची नाराजी किरकोळ कारणाने होण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी तुमचा उत्साह वाढेल. राजकीय-सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. कठीण काम रेंगाळत ठेऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्ट केस जिंकाल. शोध मोहिमेत खंबीरपणा दिसेल. शुभ दि. २३, २५

मीन ः- या सप्ताहात मंगळ मकर राशीत, शुक्र वृषभ राशीत प्रवेश करीत आहे. तुमचा आत्मविश्वास, उत्साह वाढेल. धंद्यात व्यवहारिक चर्चा नीट करा. नवे काम मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शब्द जपून वापरा. नोकरीत वर्चस्व राहील. वरिष्ठांना खूश कराल. राजकीय-सामाजिक कार्यात गुढीपाडव्यापासून नव्या कार्याचा, योजनांचा आरंभ करता येईल. प्रतिष्ठा वाढेल. लोकांच्या समस्या सोडवा. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकीक वाढेल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. शोध मोहिमेत बाजी माराल. परीक्षेच्या तयारीत आळस करू नका. मोठे यश संपादन करता येईल. शुभ दि. २७, २८ —-