घरलाईफस्टाईलमुदतपूर्व प्रसूतींमध्ये बालक जगण्याचा दर आता ९० टक्के

मुदतपूर्व प्रसूतींमध्ये बालक जगण्याचा दर आता ९० टक्के

Subscribe

दरवर्षी जगभरात १५ दशलक्ष बालकांची प्रसूती मुदतपूर्व होते. मुदतपूर्व प्रसूतीमुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे १ दशलक्ष बालकांचा मृत्यू होतो.

गर्भधारणेचे ३७ आठवडे पूर्ण होण्याआधी प्रसूती झालेल्या बाळांना मुदतपूर्व प्रसूती किंवा अपरिपक्व (प्रिमॅच्युअर) बालके म्हणतात. जगभरात बालमृत्यूंसाठी आणि व्यंग व भावी आयुष्यातील प्रकृती अस्वास्थ्यासाठीही मुदतपूर्व प्रसूती हे प्रमुख कारण आहे. दरवर्षी जगभरात १५ दशलक्ष बालकांची प्रसूती मुदतपूर्व होते. मुदतपूर्व प्रसूतीमुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे १ दशलक्ष बालकांचा मृत्यू होतो. मुदतपूर्व प्रसूती आणि/किंवा गर्भाशयात खुंटलेली वाढ यामुळे जन्मजात वजन कमी असणे (जन्मलेल्या बाळांचे वजन २५०० किलोपेक्षा कमी असणे) हे नवजात बालकांच्या मृत्यूसाठी आणि व्यंग व नॉन-कम्युनिकेबल (संसर्गामुळे न होणारे) आजारांसाठी एक प्रमुख कारण आहे.

“नवजात बालकांचा मृत्यू आणि त्यांच्यात येणारे व्यंग यासाठी मुदतपूर्व प्रसूती हे एक प्रमुख कारण असते. मुदतपूर्व प्रसूत झालेल्या बाळाची काळजी घेणे आव्हानात्मक असते आणि त्याचा कुटुंबावर प्रचंड ताण येतो. तसेच यासाठी भारतात असलेले स्रोत मर्यादित आहेत. तंत्रज्ञान आणि एनआयसीयू सुविधांमध्ये झालेल्या सुधारणांसोबतच किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी, अँटिनॅटल तपासणी, गरोदर मातांसाठी पोषण कार्यक्रम, अपरिहार्य मुदतपूर्व प्रसूतींमध्ये अँटिनॅटल स्टेरॉइड्स, निओनॅटल केअर- कांगारू मदर केअर, स्तनपानाचे महत्त्व यामुळे या बालकांचा जीव वाचण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली गेली आहे. देशातील ग्रामीण भागांमध्ये एनआयसीयू सुविधा उपलब्ध झाल्या तर आपल्या देशातील मुदतपूर्व प्रसूत झालेली बालके जगण्याचा दर हा विकसित देशांएवढा असेल.”- मदरहूड हॉस्पिटल खारघर, सल्लागार बालरोगतज्ज्ञ आणि निओनॅटोलॉजिस्ट डॉ. अभिजीत म्हापणकर 

- Advertisement -

३.३ दशलक्ष बाळांची प्रसूती मुदतपूर्व

कोणत्याही इतर देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक मुदतपूर्व प्रसूती होतात. सुमारे ३.३ दशलक्ष बाळांची दरवर्षी मुदतपूर्व प्रसूती होते आणि थेट मुदतपूर्व गुंतागुंतीमुळे ३ लाख बालकांचा मृत्यू होतो. मुदतपूर्व प्रसूती टाळण्यासाठी आणि अशा बालकांचा जीव वाचावा यासाठी भारत सरकारने पावले उचलली आहेत. यात आरोग्य केंद्रांमध्ये अँटिनॅटल कोर्टिकॉस्टिरॉइड्स (एसीएस) वापरण्याबाबत २०१४ साली प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे. नवजात बालकांचे फुफ्फुस पूर्ण विकसित व्हावे यासाठी २४ ते ३४ आठवड्यांदरम्यान प्रसूती होण्याची शक्यता असलेल्या मातांच्या बाबतीत एसीएसची अंमलबजावणी केली जावी, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

वेळ अत्यंत मौल्यवान

मुदतपूर्व प्रसूत झालेल्या बालकांमध्ये वेळ अत्यंत मौल्यवान असतो. त्यामुळे ज्या महिलांच्या गर्भधारणेमध्ये गुंतागुंत असते किंवा मुदतपूर्व प्रसूती वा कमी वजन असलेले बाळाची प्रसूती करण्याची शक्यता जिथे असेल त्या मातेची प्रसूती अद्ययावत उपकरणे उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये व्हावी, जेणेकरून नवजात बालकाच्या प्रकृतीमध्ये असलेली गुंतागुंत व्यवस्थित हाताळली जाईल. निओनॅटोलॉजी ही बालरोगशास्त्राची एक शाखा असून या शाखेत तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांतर्फे बाळाची पहिल्या महत्त्वाच्या महिन्यांमध्ये बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -