घरलाईफस्टाईललहान मुलांचे वाढवा वजन

लहान मुलांचे वाढवा वजन

Subscribe

खाण्यापिण्याच्या बाबतीत लहान मुले फार हट्ट करतात. त्यामुळे उंची न वाढणे, कुपॊषण, दृष्टिदोष, वजनात घट सारखे गंभीर आजार त्यांना लहान वयातच जडतात. मुले खात नाहीत याची पालकांना चिंता लागून राहते. अशावेळी नेहमीचे पदार्थ वापरून वेगळे पदार्थ बनवून दिल्यास मुले ते पदार्थ आवडीने खातात. शिवाय त्यांची योग्य वाढसुद्धा होते.

लहान मुलांच्या योग्य वाढीसाठी त्यांच्या दिनचर्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लहान बाळांना वेळेत खाऊ पिऊ घातल्यास ते सुदृढ होतात. तेव्हा लहान मुलांच्या दिनचर्येकडे दुर्लक्ष करू नये.

- Advertisement -

लहान मुलांचे वजन वाढण्यासाठी जेवणात तूप, लोण्याचा अवश्य समावेश असावा. पोळीसोबत तूप किंवा लोणी, तसेच वरणात तुपाचा वापर करून असा पौष्टिक खुराक लहान मुलांच्या वजन वाढीसाठी उपयोगी ठरतो. तसेच अति लहान मुलांना वरणाचे पाणी पाजणे लाभदायक ठरते.

दिवसातून एकदा उकडलेला बटाटा लहान मुलांना खाण्यास द्यावा. बटाट्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते. कडधान्यांची उसळ करताना शक्यतो मोड आलेल्या कडधान्यांचा वापर करावा. मोड आलेल्या कडधान्यांत मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळतात. मुलांच्या वाढीत प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात.

- Advertisement -

सकाळच्या न्याहरीत लहान मुलांसाठी शिरा, खीर, पोहे, उपमा, सँडविच, सूप सारख्या पदार्थांचा समावेश करावा. तसेच मुलांचे वजन फारच कमी असेल तर नियमित एक ग्लास दूध द्यावे. मुलांना दूध आवडत नसल्यास विविध प्रकारचे मिल्क शेक द्यावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -