घरलाईफस्टाईलउन्हाळ्यातही दिसा कूल

उन्हाळ्यातही दिसा कूल

Subscribe

उन्हाळ्याच्या दिवसातही कूल लूक देणार्‍या टिप्स पुढीलप्रमाणे…

लखनवी : उन्हाळ्याची फॅशन सुरू होते, ती लखनवी कुर्त्यापासून. लखनवी कुर्ती किंवा कुर्त्याइतका सुखद ड्रेस दुसरा नसेल. यंदा अनारकली स्टाइलच्या लखनवी ड्रेसची चलती आहे. त्यामुळे फिकट गुलाबी, पिस्ता, फिकट जांभळा अशा पेस्टल शेड्सबरोबरच काळपट हिरवा, आमरशी, केशरी अशा रंगाच्या अनारकली लेगइनसोबत शोभून दिसतील.

- Advertisement -

पायघोळ मॅक्सी ड्रेस : एरवी पार्टीसाठी शॉर्ट किंवा नी लेंग्थ ड्रेस आवर्जून घातला जात असला, तरी उन्हाळ्यात मॅक्सी म्हणजेच पायघोळ पार्टी वेअर किंवा कॅज्युअल जास्त चांगले दिसतात. फ्लोरल प्रिंट असलेले तसेच एकाच रंगातले मॅक्सी ड्रेस मस्त दिसतात.

पांढरा शर्ट किंवा टी-शर्ट : पांढरा फॉर्मल शर्ट किंवा टी- शर्ट आणि डेनिम जिन्सइतकं दुसरं कुठलंच कॉम्बिनेशन उन्हाळ्यात खुलून दिसत नाही. पटकन घाईत असताना, मित्र- मैत्रिणींना भेटायला जाताना हे कॉम्बिनेशन छान दिसते.

- Advertisement -

मोठी हॅट : एखादी मस्तपैकी जाळीदार हॅट तुमच्याकडे असेल, तर ती कोणत्याही वेस्टर्न ड्रेसवर छान दिसेल. एखाद्या वेळेस ड्रेस मळलेला, बोअरिंग असेल किंवा घामामुळे केस चिकट झाले असतील, तर ते हॅटमुळे लपवता येतात. शिवाय, हॅटमुळे तुमचा लूक एकदम आकर्षक दिसतो ते वेगळेच.

टू कलर सनग्लासेस : उन्हाळ्यात प्रत्येकाकडे सनग्लासेस असतातच. मात्र, टू कलर सनग्लासेस कूल लूक देऊन जातो. या एकाच सनग्लासेसमध्ये निळा आणि लाल असे दोन रंग असलेले ग्लासेस सध्या हिट आहेत. यातही गडद रंग जास्त पसंत केले जात आहेत. ही फॅशन प्रत्येकालाच कॅरी करणे शक्य नसले, तरी फिरायला गेल्यावर, बीचवर, मित्रमैत्रिणींसोबत असताना असे ग्लासेस नक्कीच कूल दिसतील.

फ्लॅट चप्पल : उन्हाळ्यात हाय हिल्सपेक्षा फ्लॅट चप्पल, सँडल, स्टिलेटो, स्लीपर्स जास्त घातले जातात. कॉन्ट्रास्ट किंवा मॅचिंग रंगाच्या स्लीपर्स, ओशो चप्पल केप्रीज, स्कर्टवर मस्त दिसतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -