घरलाईफस्टाईललढा हृदयविकाराशी - भाग २

लढा हृदयविकाराशी – भाग २

Subscribe

हार्ट अटॅकवरील उपचार

हार्ट अटॅक्स यापूर्वी म्हटल्याप्रमाणे रक्तात गुठळ्या निर्माण झाल्यास उद्भवतात. म्हणूनच रक्त पातळ करणारी औषधे यावर उपचार म्हणून दिली जातात. अस्पिरिन आणि हेपारिनसारखी रक्त पातळ करणारी औषधे, गुठळ्या नाहीशा करणारी औषधे तसेच अन्य अँटि-प्लेटलेट औषधे दीर्घकाळासाठी दिली जातात. हार्ट अटॅकमधील वेदना कमी करण्यासाठी सामान्यपणे नायट्रोग्लिसरिन हे औषध दिले जाते. ही गोळी जिभेखाली ठेवली जाते आणि लक्षणे कमी न झाल्यास वैद्यकीय मदत मिळेपर्यंत हा डोस तीनदा दिला जाऊ शकतो.

- Advertisement -

हृदयाचे स्नायू शिथिल होण्यासाठी अन्य काही औषधेही दिली जाऊ शकतात. याउलट अर्‍हिदमियासाठी तत्काळ कार्डिओपल्मनरी रेसस्किटेशनसारखे (सीपीआर) उपचार आणि ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफायब्रिलेटर यांची आवश्यकता भासते. सीपीआर हा रक्तप्रवाह व इंद्रियांना रक्तपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी केला जाणारा मानवी हस्तक्षेप आहे. एईडीमध्ये हृदयाला इलेक्ट्रिक शॉक दिला जाऊन त्याची सामान्य लय पूर्ववत केली जाते. रुग्ण वाचण्याची शक्यता वाढवण्यासाठी या प्रक्रियेचे तसेच साधने वापरण्याचे पूर्ण ज्ञान असणे अत्यावश्यक आहे.

हार्ट अटॅकला प्रतिबंध

- Advertisement -

हार्ट अटॅकला प्रतिबंध करण्यासाठी जीवनशैलीत तसेच आहारात बदल करणे महत्त्वाचे आहे. चरबीयुक्त पदार्थांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठून राहते (प्लाक) व अडथळे निर्माण होऊ शकतात. शारीरिक हालचाल नसल्यास ही परिस्थिती अधिक खराब होते. दररोज एक तास मध्यम स्वरूपाचे शारीरिक व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. मग ते एरोबिक्स, नृत्य, चालणे, स्ट्रेंग्थ ट्रेनिंग यापैकी कोणत्याही स्वरुपात असोत.

शरीराचे वजन नियंत्रणात राखणे अत्यावश्यक आहे. कारण, मध्यवर्ती स्थूलत्व (पोटाभोवती चरबी साठणे) ही समस्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आढळते. अचानक येणारे अटॅक्स व अर्‍हिदमियाचा प्रतिबंध करणे शक्य नसले तरी आपण एक शिस्तबद्ध जीवनशैली अंगिकारून आपल्या वाट्याला आलेला धोका कमी करावा हे आपले कर्तव्य आहे.

-डॉ. नारायण गडकर हृदयरोगतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -