घरलाईफस्टाईलगर्भाशयाचा कर्करोग (भाग- १)

गर्भाशयाचा कर्करोग (भाग- १)

Subscribe

पॅप स्मिअरच्या साह्याने सुरुवातीच्या टप्प्यातच गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्यास त्यातून बचावण्याची शक्यताही वाढते

पॅप स्मिअर किंवा पॅप टेस्ट म्हणजे स्त्रियांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाची चाचणी. यामुळे, पॅप स्मिअरच्या साह्याने सुरुवातीच्या टप्प्यातच गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्यास त्यातून बचावण्याची शक्यताही वाढते. पॅपिनोकोलोऊ स्मिअर किंवा पॅप स्मिअर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चाचणीचा शोध ग्रीक फिजिऑलॉजिस्ट जॉर्जिओज पॅपॅनिकोलोऊ यांनी लावला. गर्भाशयातील पेशींमधील असमान्य बदलांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आपल्या प्रेयसीच्या योनीमार्गातील द्रावाचे दैनंदिन स्वरुपावर नमुने घेऊन त्याचा अभ्यास केला. कालांतराने त्यांनी आपल्या इतर मैत्रिणींवरही या चाचणीचे प्रयोग केले आणि त्यातील एका स्त्रीमध्ये इतर कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसण्याआधी गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान केले.

गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे

गर्भाशयाचा कर्करोग हा हळूवार वाढणारा कर्करोग आहे. विशेष म्हणजे यात सुरुवातीच्या टप्प्यात, पांढरे जाणे, योनीमार्गातील द्रावाला दुर्गंधी येणे किंवा समागमानंतर रक्तस्राव होणे यासारखी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. कर्करोगपूर्व किंवा कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इमेजिंग तंत्रज्ञानातही हा आजार कळून येत नाही. त्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. शिवाय, यातून बचावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे आणी मृत्यूचे अधिक. कारण, यातील अनेक रुग्णांमध्ये या कर्करोगाचे निदान फारच पुढच्या टप्प्यात होते.

- Advertisement -

या रोगाचे निदान करण्यास पॅप स्मिअर मदत 

पॅप स्मिअर ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि सोपी चाचणी आहे. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये किंवा बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) ओटीपोटाचा भाग तपासून ही चाचणी करता येते. त्यामुळे, स्त्रियांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाची चाचणी आणि निदान करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. यात रुग्णाला पाठीवर झोपवून पाय फाकवून स्पेकलमच्या साह्याने गर्भाशयाची तपासणी केली जाते. हा आजार किंवा इतर काही समस्या आहे का हे तपासण्यासाठी गर्भाशयाच्या काही पेशी खरवडून काढल्या जातात आणि त्यांना मायक्रोस्कोपखाली तपासले जाते.

(डॉ. विना औरंगाबादवाला, स्त्री रोग तज्ज्ञ)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -