घरलाईफस्टाईलझटपट 'किचन टीप्स'

झटपट ‘किचन टीप्स’

Subscribe

'किचन टीप्स'

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • ओव्हनमध्ये एखादा पदार्थ बनवून झाल्यावर दुर्गंधी येत असेल तर १ वाटीत पुदिन्याची पाने घ्या आणि ५ ते १० मिनिटा करता ओव्हन चालू ठेवा. त्यानंतर पुदिन्याच्या पानांना ओव्हनमध्ये १ तासांसाठी तसेच ठेवा आणि मग काढून घ्या. दुर्गंधी दूर होते.
  • ओव्हनमध्ये १ वाटीत २ कप पाणी भरा त्यात १ चमचा लिंबाचा रस टाका. आता ओव्हन ५ मिनिटे चालू ठेवा. जेव्हा ते थांबेल तेव्हा एका कपड्याने साफ करुन घ्या. यामुळे ओव्हन पण साफ होईल आणि चांगला सुगंध ओव्हनमध्ये येईल.
  • किचन बेसिनचा चिकट ग्रीस काढण्यासाठी परत परत गरम पाणी टाकावे लागते. अशावेळी गरम पाणी टाकल्यानंतर त्यात एक कप पांढरे व्हिनेगर टाका आणि बेसिनला थोडे बेकिंग पावडरने साफ करा.
  • फ्रिज आतून साफ करताना गरम पाणी आणि बेकींग सोडा एकत्र करुन फ्रिज साफ करा.
  • किचन बेसिनच्या सफाईकरता चिंचेच्या पाण्यात मीठ टाकून साफ करा. बेसिन चकाचक होण्यास मदत होते.
  • चहा बनवून झाल्यावर उरलेली चहापती परत पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर पाणी थंड झाल्यानंतर पाणी गाळून घेऊन त्या पाण्याने आरश्याची सफाई करा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -