घरलाईफस्टाईलहोममेड 'मटका कुल्फी'

होममेड ‘मटका कुल्फी’

Subscribe

'मटका कुल्फी' रेसिपी

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गारेगार आईस्क्रिम खाण्याची सर्वांनाच इच्छा असते. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे बाजारात आईस्क्रिम देखील उपलब्ध नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरीच होममेड ‘मटका कुल्फी’ कशी बनवाची हे सांगणार आहोत.

साहित्य

- Advertisement -
  • दूध
  • मिल्क पावडर
  • साखर
  • मावा
  • मावा इसेन्स

कृती

सर्वप्रथम एक लिटर दूध आटवून त्याचे अर्धा लीटर दूध करा. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जितका गोडवा हवा तितकी साखर, मिल्क पावडर आणि कॉर्न पावडर मिक्स करा. नंतर गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर त्यात मावा इसेन्स आणि ताजा मावा टाकून सेट करा. कुल्फी सेट करण्यासाठी कमीत कमी २४ तास लागतात. त्यामुळे ज्या दिवशी कुल्फी खायची असेल त्याच्या आधी एक दिवस कुल्फी करण्याचा बेत आखा. कुल्फीसाठी मिळणाऱ्या कुल्फी मोल्ड अथवा छोट्या छोट्या मातीच्या मटक्यांमध्ये सेट करू शकता. त्यानंतर थंडगार कुल्फीवर किसलेल्या बदाम- पिस्ताचे काप टाकून सर्व्ह करा.

- Advertisement -

हेही वाचा – सकाळचा नाश्ता : मसाला पोळी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -