घरलाईफस्टाईलवाचा - मोबाईल पाण्यात पडल्यास काय कराल?

वाचा – मोबाईल पाण्यात पडल्यास काय कराल?

Subscribe

रंगपंचमीच्या दिवशी रंगामध्ये सर्वजण रंगून जातात. या आनंदी क्षणाला कैद करण्यासाठी अनेक तरुण-तरुणी मोबाईलचा वापर करतात. मात्र रंगपंचमीच्या दिवशी मोबाईलची कशी काळजी घ्यावी. हा प्रश्न पडतो. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. अशा काही टीप्स आहेत. त्यामुळे तुमचा मोबाईल ही सुरक्षित राहण्यास मदत होईल आणि फोटो ही काढता येतील.

होळी म्हटलं की रंग हे आलेच. या रंगात रंगण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. त्यामुळे अनेक जण आनंदाने मनसोक्त रंगाचा आणि पाण्याचा आनंद घेत होळी खेळतात. तसेच या क्षणाचे फोटो काढण्याचा अनेक तरुण-तरुणींना मोह आवरत नाही त्यामुळे मोबाईल हा वापरलाच जातो. परंतु फोटो काढताना अचानक मोबाईल रंगात अथवा पाण्यात पडल्यास आनंदावर विरजन पडते. मनोसक्त रंग खेळताना किंवा पाण्यात भिजताना आपलं सगळं लक्ष आपल्या मोबाईल फोनकडे असते. मात्र अशा काही टीप्स आहेत. ज्यामुळे तुमच्या रंगाचा बेरंग न होता मनोसुक्त आनंदाने होळी खेळून फोटो देखील काढू शकता.

  • रंगपंचमीच्या दिवशी बाहेर पडताना मोबाईलसाठी वॉटरप्रूफ कव्हर वापराव.
  • मोबाईल पाण्यात पडल्यास तो ताबडतोब बाहेर काढून लगेचचं स्विच ऑफ करा. ओला मोबाईल पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करु नका.
  • मोबाईलमध्ये पाणी गेले असेल तर सर्वप्रथम सिमकार्ड, मेमरी कार्ड काढून घ्या. त्यानंतर मोबाईल कव्हर, स्क्रीन कव्हर वेगळे करा.
  • मोबाईलचे भाग वेगळे काढल्यानंतर प्रत्येक भाग कोरड्या कापडानं आणि हलक्या हातानं पुसून घ्या. कोणत्याही भागावर पाण्याचा अंशही राहणार नाही, याची काळजी घ्या.
  • मोबाईल ओला झाल्यानंतर तांदळाच्या हवाबंद डब्यात ठेवा. दोन दिवस मोबाईल तांदळाच्या डब्यात ठेवल्यास कोरडा होतो.

अनेकदा भिजलेला मोबाईल काही वेळात सुरु होतो. त्यावेळी सर्वप्रथम त्यातील महत्त्वाचा बॅकअॅप घेऊन ठेवा. कारण भिजलेला मोबाईल कधीही डेड होण्याची शक्यता असते.

- Advertisement -

ही चूक करु नका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -