घरलाईफस्टाईलबालूशाही

बालूशाही

Subscribe

साहित्य

मैदा 1 कप,
1/2 टी स्पून खाण्याचा सोडा,
2 टेबलस्पून तूप,
3 टेबलस्पून दही,
चिमूटभर मीठ,
पाऊण कप साखरेचा 1/2 तारी पाक,
तळण्यासाठी तूप 3/4 कप.

कृती-

*साखरेत, साखर भिजेल इतके पाणी घालून ते 1/2 तारी पाक तयार करून ठेवा.

- Advertisement -

*मैद्यात मीठ, त्यानंतर अनुक्रमे तूप व दही घालून मिक्स करा. गोळा तयार करा. फक्त एक चमचा पाणी लागले तर घाला. अर्धा तास हा गोळा मुरु द्या.

*कढईत तूप मंद गॅसवर तापायला ठेवा. मुरलेल्या गोळ्यातून पेढ्याचा आकाराच्या बालूशाही करा.

- Advertisement -

* त्यामध्ये अंगठ्याने दाब देवून खळगा करा. गरम तुपात अगदी मंद आचेवर तळा.

*कढईत 4-5 बालूशाही सोडल्यावर त्या एका बाजूने तळल्या गेल्या/शिजल्या की वर येतात.

*आता त्याची बाजू पलटा. अगदी मंद गॅसवरच तळायच्या आहेत, नाहीतर आतून कच्च्या राहातील.

*जर कढईचा तळ पातळ असेल तर त्याखाली तवा ठेवा म्हणजे आच कमी लागेल. गुलाबी रंगावर या बालूशाही तळून घ्या. एका घाण्याला साधारण 8 ते 10 मिनिटे लागतात.

* तरच त्या आतून खरपूस तळल्या जातील. तळलेल्या बालूशाही थंड करायला ठेवा.

*या थंड झालेल्या बालूशाही, थंड पाकात किमान 1/2 ते 1 तास ठेवा. त्यानंतर या बालूशाही पाकातून बाहेर काढून ठेवा.

*खूप छान खुसखुशीत बालूशाही तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -