घरलाईफस्टाईलस्टायलिश साड्यांनी सजवा तुमचा वॉर्डरोब

स्टायलिश साड्यांनी सजवा तुमचा वॉर्डरोब

Subscribe

साडी म्हटले की, भारतीय महिलांचा अगदी हळवा कोपरा. असे म्हणतात स्त्रीचे खरे सौंदर्य हे साडीमध्ये दिसून येते. आणि म्हणूनच की काय लग्नाच्या पाहणीला मुलीला हमखास साडीत बघण्याची परंपरा जोपासली जाते.

सण-समारंभापासून ते अगदी सेलिब्रेशन पार्ट्यांपर्यंत अनेक छोट्या-मोठ्या कार्यक्रमात स्त्रिया साड्यांमध्ये मिरवणं पसंत करताना दिसतात. कपाटात कितीही नवीन आणि महागडी साडी असली तरी प्रत्येक स्त्रीला नवीन साडी ही हवीच असते. नव-नव्या साड्यांची ओढ त्यांना खुणावतच असते. साड्यांमध्ये पारंपरिक साड्यांपासून ते फॅशनेबल साड्यांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अगदी घरगुती कार्यक्रमापासून तर लग्न समारंभापर्यत अनेक फॅशनेबल नव्या ट्रेंडच्या साड्या मार्केटमध्ये आल्या आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्या त्या समारंभाला साजेशी अशी साडी निवडल्यास तुमच्या सौंदर्याची चारचौघांत चर्चा तर होईलच सोबतच तुम्हाला समारंभाचा आनंदही घेता येईल.

- Advertisement -

जॉमेट्रिकल प्रिंट साडी –

फ्लोरल बांधणी प्रिंटच्या साड्यांबरोबरच सध्या जॉमेट्रिकल प्रिंट साडी फॅशनमध्ये आहे. या साडीच्या प्रिंटवर भूमितीय आकाराची डिझाईन असते. शिफॉन, जॉर्जेट आणि सिल्क या फॅब्रिक्स मटेरीयलमध्ये या साड्या उपलब्ध आहेत. कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये देखील तुम्ही या साड्या घालू शकता.जॉमेट्रिकल प्रिंटच्या डिझाईनमुळे तुम्हाला एक वेगळाच लूक मिळू शकतो.

रेडिमेड डिझायनर साड्या-

या नेसायला अगदी सोप्या असून काहीशा घागराचोलीसारख्या दिसतात. त्यामुळे तरुण मुलींसाठी ही स्टाईल वेगळी आणि आकर्षक ठरू शकते. ‘सेंटर पॉपिंग प्लेट्स’ असणार्‍या या साड्या वेस्टर्न लूक देतात.

- Advertisement -
स्टायलिश बॉर्डर साडी –

साड्यांची बॉर्डर म्हणजे साडीचा प्लस पॉईंटच असतो. याच बॉर्डर जर आणखी आकर्षक असतील तर मग बघायलाच नको. साडीच्या बॉर्डरमुळे साडी अधिक उठून दिसते. त्यामुळे साडी खरेदी करताना साडीची बॉर्डर आकर्षक आणि रेखीव आहे का हे महिला आवर्जून पाहतात. प्लेन सिल्क, कॉटन सिल्क या साड्यांच्या बॉर्डरमध्ये सध्या विविध प्रकार बघायला मिळत आहेत. या अनोख्या बॉर्डरमुळे साडी अधिक स्टायलिश दिसते. आऊटिंगला जाताना तुम्ही ही साडी अगदी सहजपणे कॅरी करू शकता.

नेटेड साड्या-

नेटेड फॅब्रिकमुळे वजनाला अगदी हलक्या असणार्‍या या साड्यांवर नाजूक टिकली वर्क किंवा एम्ब्रॉयडरी अधिक उठून दिसते.साडीच्या काठाला आकर्षक उठावदार नक्षीकाम केलेली जाड लेस असलेल्या नेटेड साड्याही सोबर दिसण्याबरोबरच एकूणच व्यक्तिमत्त्वाला बोल्ड लूक देतात. या नेटेड साड्यांच्या आतील पेटिकोट वा परकर जर फिश कट आकाराचा आणि ब्लाऊजही प्रिन्सेस कटमध्ये शिवल्यास तुम्ही ‘फॅशनेबल’ असल्याची छाप नक्कीच इतरांवर पडेल.

बिना प्लेट्सची साडी-

सध्या बाजारात या हटके प्रकारच्या साड्या उपलब्ध झालेल्या आहेत. फॅशन डिझायनर्स साड्यांवर नव- नवीन प्रयोग करताना दिसत आहेत. अनेक अभिनेत्रींनी या साडीला पसंती दिली आहे. बिना प्लेट्सची साडी तुम्हाला वेस्टर्न सोबतच एथनिक लूकही देते. त्यामुळे तुम्ही या साडीमुळे ग्लॅमरस दिसू शकता. तरुणींची या साडीला विशेष मागणी दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -