घरलाईफस्टाईलउबदार कपड्यांची अशी घ्या काळजी

उबदार कपड्यांची अशी घ्या काळजी

Subscribe

हिवाळ्याच्या दिवसात उबदार कपड्यांची देखभाल करणे ही एक समस्या आहे. काही लोक महागड्या उबदार कपड्यांना साबणाने धुतात तसेच डिटर्जंटही वापरतात.

आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, उबदार कपड्यांचे फायबर्स इतर कपड्यांच्या तुलनेत कमजोर असतात. यामुळे अशा कपड्यांचे लवकर नुकसान होतं.

- Advertisement -

म्हणून उबदार कपड्यांकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. खास करून असे कपडे धुताना जास्त काळजी घ्यावी लागते. अनेक लोकांची अशी तक्रार असते की, नवा स्वेटर धुताच सैल पडला, अशा वेळेस काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊ या.

सामान्यत: लोकांचा समज असतो की, उबदार कपडे एक- दोन आठवडे न धुताच घालू शकतो जे अत्यंत चुकीचे आहे. या कपड्याची स्वच्छता देखील सामान्य कपड्यांप्रमाणे घ्यायला हवी. कारण धुळ आणि घाण उबदार कपड्यांमध्ये लगेच चिकटते.यामुळे उबदार कपड्यांना खूप दिवस धुतले नाही तर वास यायला लागतो. म्हणून ते वेळोवेळी धुणे आवश्यक आहे. पण उबदार कपड्यांची स्वच्छता करण्याची थोडी वेगळी पद्धत आहे.

- Advertisement -

*उबदार कपड्यांना धुण्यापूर्वी पाण्यात थोडावेळ भिजत घाला. जेणेकरून त्यातील धुळीचे कण किंवा चिकटलेले इतर कचरा घाण पाण्यात निघून जातील.

*या कपड्यांचा स्वभाव (प्रकार) जाणून घेण्यासाठी त्यावर लिहिलेला टॅग अवश्य वाचा. कारण त्यावर कपड्याच्या प्रकारनुसार ते कसे धुवावेत हे लिहिलेले असते.

*कपडे पाण्याने धुवावेत की, ड्रायक्लिन करावेत किंवा ते मशीनमध्ये धुवावे की नाही हेही टॅगवर दिलेले असते. म्हणून कपड्यांवर लावलेल्या टॅगकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जेणे करून तुमच्या अज्ञानामुळे कपड्यांचं नुकसान होणार नाही.

*उबदार कपड्यांचे तंतू नाजूक असतात. त्याला स्वच्छ करताना ब्रश लावल्यास कपड्याचे तंतू खराब होऊ शकते. म्हणून शक्यतोवर उबदार कपड्यांना ब्रश लावू नये.

*उबदार कपडे वॉशिंगमशिनमध्ये फक्त १० सेकंदच सुकवा. नंतर मात्र कडक उन्हात सुकवायला ठेवायला विसरू नका.

*हे कपडे जिथे सुकवता ती जागा स्वच्छ असावी. कारण, या कपड्याचे तंतू हे धुळीचे कण लवकर चिकटून बसतात. त्या धुतलेल्या ओल्या कपड्यांना परत धूळ, घाण लागून ते खराब होऊ नये म्हणून ते सुकवताना देखील योग्य ठिकाणी सुकवता येईल याची काळजी घ्यावी.

*कपडे धुऊन सुकल्यानंतर तुम्ही जिथे साठवणार आहात तिथे मैंथॉल बॉल्स, डांबराच्या गोळ्या, किटाणूनाशक प्लेक्स जरुर ठेवावेत. जेणेकरून उबदार कपडे किटाणूरहीत होतील.

*थंडी संपल्यानंतर लगेच उबदार कपडे स्वच्छ करून एअर टाईट कंटेनरमध्ये बंद करून ठेवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -