घरलाईफस्टाईलखमंग नाश्ता: रवा-बेसन वडी

खमंग नाश्ता: रवा-बेसन वडी

Subscribe

बऱ्याचदा नाश्ता काय करावा, असा सर्वच गृहिणींना प्रश्न पडतो. त्यात तो नाश्ता पौष्टिक असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खमंग आणि चविष्ट नाश्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहोत.

साहित्य

  • १ वाटी रवा
  • १ वाटी बेसन
  • चिमूटभर हळद
  • तेल
  • लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो
  • कडीपत्ता
  • लिंबू
  • जिरं
  • ओवा
  • हिंग

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात रवा, बेसन पीठ आणि हळद एकत्र करुन त्यात गरजेनुसार पाणी घालून घ्यावे. त्यानंतर ते मिश्रण चांगले एकजीव करावे. त्यानंतर गॅसवर पॅन ठेऊन त्यात तेल, जिरं, ओवा, मीठ, कडीपत्ता आणि हिंग घालून परतवून घ्यावे. त्यानंतर जिरं तडतडल्यावर त्यात बेसनचे तयार केलेले मिश्रण घालून एकत्र करुन घ्यावे. मिश्रण घट्ट झाले की त्यात कांदा, टोमॅटो, लाल तिखट आणि लिंबूचा रस घालून पुन्हा एकजीव करुन घ्यावे. नंतर ते सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर एका ताटलीला तेल लावून ते सर्व मिश्रण ताटात सेट करुन घ्यावे. नंतर त्याच्या वड्या पाडून एका पॅनवर तेल घालून चांगले शॅलोफ्राय करुन घ्यावे, अशाप्रकारे चटपटीत असा नाश्ता तयार. या वड्या तुम्ही सॉस किंवा दह्यासोबत खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -