घरलाईफस्टाईलदिशाहीन कोहोज

दिशाहीन कोहोज

Subscribe

जेव्हापासून ट्रेकिंगचं वेड लागलं तेव्हापासून आयुष्यातील बर्‍याच छोट्या-मोठ्या निर्णयावर शिक्कामोर्तब हा समुद्रसपाटीपासून काही हजार फुटांच्या उंचीवर केला गेला. आपुलकीचे अनेक सल्ले, सुचना ऐकल्यानंतर आपल्या मनाला अपेक्षित असं उत्तर हे उंचावर, एखाद्या कोपर्‍यात धुक्याच्या गर्दीतच मिळतं. पायथ्यापासून योग्य वाट शोधत फिरणारी पावलं तेव्हाच जाणतात की, sometimes it’s the journey that teaches you a lot about your destination.

घरापासून अगदी अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या कोहोज किल्ला सर करण्याचे HiCaMont टीमने ठरवलं. त्यासाठी आदल्या रविवारी पायपीट केली. परिणामी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बंदार्‍यापर्यंत bike घेऊन येता येईल हे conclusion निघाले. त्यामुळे आम्ही आमचा बराच वेळ आणि energy वाचवली. कोहोज किल्ला सहज सर होईल असं वाटत असलं तरी difficulty level high आहे, इथल्या असंख्य वाटा तुम्हाला संभ्रमात टकतात… असं बरंच काही वाचलं आणि ऐकलं होतं. तरीही कोणतेच presumptions मनात न ठेवता आम्ही trek सुरू केला.

सुरूवातीच्याच patch मध्ये ‘मंजिल कही ओर, रास्ता कही ओर’चा अनुभव आला. मात्र कधी-कधी directionless असणंही बरच काही शिकवून जातं. मुळात भटकलेल्या वाटेवरच self-realization साठी बराच वेळ मिळतो. आणि मग योग्य वाट मिळाली की&. EUREKA!!!आमचा उत्साह तर एव्हाना गडावर पोहोचलाही होता. आळसी झालेल्या शरीराची टंगळमंगळ सुरू हाती. लोकांचा कल्ला कानावर आला आणि आपण on track आहोत हे कळलं. त्या group सोबत असलेला एक पाच-सहा वर्षांचा विक्रम आम्हाला lead करत होता. आई-बाबांना न जुमानता त्याची अखंड बडबड सुरू होती. अचानाक तो धडपडला. स्वत:च सावरत, जबरदस्त confidenceने वाक्य झाडलं, ‘a true soldier will never die’. आणि पुन्हा इटुकली-पिटुकली पावलं मोठ्या दगडांवर टाकू लागला.

- Advertisement -

वाटेतच बर्‍याच प्रश्नांची उत्तरं मिळाली. ध्येय दृष्टीक्षेपात आलं. एक लहानसं गाव वसू शकेल एवढं मोठं पठार, पाण्याची कुंड, जैवविविधता, भौगोलिक रचना यामुळेच पुरंदरच्या तहात इतर बावीस किल्ल्यांसह कोहोज किल्ला गमावणं शिवाजी महाराजांना जिव्हारी लागलं असणार हे नक्की. गडावर निसर्गत: हात पसरवून उभा असलेल्या माणासाची प्रतिकृती येणार्‍या प्रत्येकाला आलिंगन देते. तिथवर पोहोचल्याचा आनंद आपल्यापेक्षा तिलाच जास्त झालेला असतो. आकाशही ठेंगणं होऊन या आनंदात सहभागी होते. HiCaMontने पाडलेल्या पायंड्याप्रमाणे या सगळ्यांसोबत एक कड्डक चहा झाला आणि मग कितीतरी वेळ फक्त हवेशी शब्दाविना संवाद सुरू राहिला. त्यातच उलगडलं

जीवन के पन्नो मे हजारों सवाल है
पर इस वादियों मे छिपे कई जवाब है
सुनो सिर्फ दिल की आवाज
क्योकी इसमे बसे कई ख्वाब है

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -