वर्ल्ड स्लीप डे; जमिनीवर झोपण्याचे फायदे

जमीनीवर झोपण्यामुळे अनेक फायदे होतात. हे फायदे संगळ्यानाच माहित असतातच असे नाही. त्यामुळे दि. १४ मार्चाला वर्ल्ड स्लीप डेच्या निमित्त जमीन वर झोपण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत.

Mumbai
world sleep day
वर्ल्ड स्लीप डे; जमीनीवर झोपण्याचे फायदे

प्राचीन काळापासून प्रत्येक घरामध्ये जमिनीवर झोपण्याची परंपरा आहे. मात्र, कुठेतरी ही परंपरा मागे पडल्याचे दिसत आहे. बदलत्या जीवनशौलीप्रमाणे झोपण्याच्या परंपरेतही बदल झालेले दिसत आहेत. सध्या जमिनीवर झोपण्याचे प्रमाण हे कमी झाले आहे. मऊ गालीच्यावर आणि बेडवर झोपायला लागले आहेत. बेडवर झोपल्यामुळे कंबर दुखीचे प्रमाण हे वाढत आहे. तसेच त्यामुळे शरीराला अन्य रोगही जडत आहेत. मात्र, जमिनीवर झोपण्यामुळे अनेक फायदे होतात. हे फायदे संगळ्यानाच माहित असतातच असे नाही. त्यामुळे दि. १४ मार्चाला वर्ल्ड स्लीप डेच्या निमित्त जमिनीवर झोपण्याचे फायदे सांगण्यात येत आहे.

१. जर आपण जास्तवेळ लॅपटॉप, कंप्यूटर वर सतत काम करत असल्यामुळे कंबर दुखी आणि पाठ दुखीची समस्या सतावत असते. अशा वेळी जर जमिनीवर झोपण्याची शरीराला सवय लावलीत तर, कंबरदुखी आणि पाठदुखीच्या समस्ये पासून सूटका मिळू शकते.

back pain
कंबर दुखी आणि पाठ दुखी

२. काही लोक ही खूप वाकून काम करतात किंवा पोक काढून चालतात त्यामुळे त्यांच्या शरीर रचना बिघडताना दिसते. ते बघताना खूप खराब दिसते. त्यामुळे जर आपल्याला आपली शरीर रचना चांगली ठेवायची असेल तर जमीनीवर झोपण्याची सवय लावणे गरजेचे आहे.

back pain
पोक काढून किंवा वाकून चालण्यानी

३. जेव्हा खांद्या आणि कंबरेच्या वेदना जाणवतात, त्यावेळी जमीनीवर झोपल्यामुळे त्यावेदना कमी होतात. तर शरीरलाही रिलॅक्स वाटते. अशा प्रकारच्या समस्या दुर होण्यास मदत होते.

Back pain
खांदे दुखी

४. जमिनीवर झोपल्यामुळे लोकांना जास्त खूश आणि रिलॅक्स वाटते. यामुळे मानसिक रोग होण्याची काळजी सतावत नाही, ते होणाचा समस्या कमी होतात.

mentally disturb
मानसिक रोगापासून मुक्ती

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here