सफाई कर्मचार्‍याने केला कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग

डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील घटना

molestation
प्रातिनिधीक फोटो

कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचार्‍याने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (दि.८) सायंकाळी डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात घडली. सफाई कर्मचारी फरार झाला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम कामकाज सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित महिला चार दिवसांपुर्वी रूग्ण डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात उपचारार्थ दाखल झाली. मंगळवारी कोरोनाबाधित महिला शौचालयात गेली असता रूग्णालयातील सफाई कर्मचार्‍याने तिचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरडा केला असता कर्मचारी फरार झाला. ही बाब आमदार देवयानी फरांदे यांना समजताच त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. रावते व भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या चर्चा केली. संबंधित कर्मचार्‍याला निलंबित करून त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी सूचना आमदार फरांदे यांनी केली आहे.