घरमहाराष्ट्रनाशिकउत्तीर्ण झालेले डॉक्टर जळगावात देणार वर्षभर सेवा

उत्तीर्ण झालेले डॉक्टर जळगावात देणार वर्षभर सेवा

Subscribe

हा मुददा निकाली काढत आता एमडी, एमएस उत्तीर्ण झालेल्यांमधून ५४ डॉक्टरांची सेवा एक वर्षाच्या बंधपत्रावर घेण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना रूग्णसेवा देण्यासाठी वैद्यकिय सेवा देणारया डॉक्टरांची मोठी कमतरता भासत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टरही सेवा देण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येते. मात्र आता एमडी, एमएसच्या परिक्षा उत्तीर्ण झालेल्या ५४ डॉक्टरांची सेवा वर्षभरासाठी घेण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्त जागांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाला कोविड घोषित केल्यानंतर या ठिकाणच्या मनुष्यबळाची कमतरता हा कळीचा मुददा बनला. एकिकडे रूग्णसंख्या झपाटयाने वाढत असतांना हा मुददा अधिकच गंभीर बनला. मात्र हा मुददा निकाली काढत आता एमडी, एमएस उत्तीर्ण झालेल्यांमधून ५४ डॉक्टरांची सेवा एक वर्षाच्या बंधपत्रावर घेण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. यामध्ये सर्जरी १६, भूलतज्ज्ञ ६, औषध वैद्यक शास्त्र ४, सूक्ष्मजीवशास्त्र २, नेत्ररोग ४, आर्थोपेडीक ५, रेडीओलॉजिस्ट ३, पॅथॉलॉजिस्ट २, क्षयरोग विभाग १, स्त्रीरोग विभाग ३ अशी पदे भरण्यात आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -