महाराष्ट्रात मुलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०१७ च्या तुलनेत २२ टक्के वाढ नोंदवण्यात आली.

New Delhi
sexual abuse 109 children daily maharashtra uttar pradesh highest incidence
महाराष्ट्रात मुलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार

२०१८ मध्ये भारतात दर दिवशी सरासरी १०९ बालकांचे लैंगिक शोषण झाले असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. देशातील महिलांबरोबर लहान मुलेही सुरक्षित नसल्याची धक्कादायकबाब उघडकीस आली आहे. या आकेवाडीनुसार अशाप्रकरणाच्या २०१७ मध्ये ३२,६०८ घटना घडल्या होत्या तर २०१८ मध्ये ३९,८२७ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यात २०१७ च्या तुलनेत २२ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक २,८३२ मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे महाराष्ट्रात नोंदवण्यात आले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशात २,०२३ गुन्ह्यांसह दुसरा क्रमांक तर तामिळनाडूचा १,४६७ गुन्ह्यांसह तिसरा क्रमांक आहे.

लहान मुलांना लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि अश्लील साहित्य छायाचित्र अशा गुन्हांपासून बालकांचे संरक्षण देणार पोक्सो २०१२ सर्वसमावेश कायदा आहे. या अंतर्गत विशेष न्यायालये, विशेष वकील तसेच पीडित मुलांसाठी सहाय्यक यांची तरतूद आहे.

२०१८ मध्ये एकूण ६७,१३४ मुले हरवली

बालकांशी संबंधित गुन्हांचे प्रमाण सहापटीने वाढले आहे. २००८ मध्ये २२,५०० तर २०१८ मध्ये १,४१,७६४ असे गुन्हे घडले आहेत. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये बालकांचे अपहरण करण्यात आलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण ४४.२ टक्के इतके असून पोस्कोतहत घडलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण ३४.७ टक्के आहे. २०१८ मध्ये एकूण ६७,१३४ मुले हरवली आहेत. त्यात १९,७८४ मुले तर ४७,२९१ मुली आहेत. याशिवाय १५९ तृतीयपंथींचा समावेश देखील आहे.


हेही वाचा – ‘वाडिया’ला वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here