घरताज्या घडामोडीडोंबिवलीत आगडोंब; शाळा, महाविद्यालयाना सुट्टी

डोंबिवलीत आगडोंब; शाळा, महाविद्यालयाना सुट्टी

Subscribe

डोंबिवलीमध्ये एमआयडीसी केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याने डोंबिवलीतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

माझगावमध्ये जीएसटी भवनच्या इमारतीला मंगळवारी दुपारी आग लागल्याची घटना ताजी असताना बुधवारी डोंबिवलीमध्ये एमआयडीसी केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. डोंबिवली एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन कंपनीत आग लागली असून ही कंपनी त्याच रस्त्यावर आहे जेथे काही दिवसांपूर्वी प्रदुषणामुळे रस्ते गुलाबी झाले होते. त्याच भागातील डोंबिवली एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन कंपनीत ही भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या १६ तासांपासून ही आग धुमसत असून जवळपासच्या सर्व नागरिकांना लवकरात लवकर घरे रिकामी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच डोंबिवलीकरांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन देखील केले असून डोंबिवलीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

१६ तासांपासून आग धुमसत आहे

एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन कंपनीत लागलेली आग गेल्या १६ तासांपासून धुमसत आहेत. त्यामुळे सुरक्षितेकरता याठिकाणी खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच या परिसराच्या आजूबाजूच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सदर कंपनी ही केमिकल कंपनी असल्याने या आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. याठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही आजूबजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सावधान! सरकत्या जिन्यावरुन प्रवास करताय; तुमच्यासोबतही ‘हे’ होऊ शकत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -