निवडणुकीत केलेला दावा खोटा होता का? – उद्धव ठाकरे

काळ्या पैशांच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी सरकारची टीका केली आहे. काळ्या पैशाविषयीचा तपशील उघड केला तर तपास प्रक्रियेवर ‘प्रभाव’ पडेल हा सरकारचा ‘दावा’ खरा मानला तर मग निवडणुकीत केलेला ‘वादा’ खोटा होता असे मानायचे का? असा सवालही त्यांनी लगावला आहे.

Mumbai
uddhao-thackraye
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे

काळ्या पैशांच्या मुद्यावर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सामना मुखपृष्ठातून मोदी सरकारवर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, काळ्या पैशाविषयीचा तपशील उघड केला तर तपास प्रक्रियेवर ‘प्रभाव’ पडेल हा सरकारचा ‘दावा’ खरा मानला तर मग निवडणुकीत केलेला ‘वादा’ खोटा होता असे मानायचे का? असेच तुणतुणे दुसऱ्या कोणी वाजवले असते तर दाल में कुछ ‘काला’ है अशी हाकाटी ज्यांनी पिटली असती तेच आता सत्तेत आहेत आणि त्याच तुणतुण्याचा आधार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशातून आणलेल्या काळ्या पैशाच्या तपशिलाची मागणी केली तर सरकारच ‘नकारघंटा’ वाजवते तेव्हा काळ्या पैशाचे गूढ आणखीनच वाढते, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा – काळ्या पैशांची माहिती देण्यास पीएमओने दिला नकार

काय आहे नेमकं प्रकरण?

भारतीय वन सेवेतील अधिकारी चतुर्वेदी यांनी माहितीच्या अधिकारामार्फत सरकारकडून माहिती मागितली आहे. त्यांनी या माहिती अधिकारात सरकारने २०१४ पासून आतापर्यंत किती काळा पैसा भारतात आणला, अशी माहिती मागितली होती. १६ ऑक्टोबरला केंद्रिय माहिती आयोगाने हा प्रस्ताव दाखल करुन १५ दिवसांच्या आत विदेशातून भारतात आणलेल्या काळ्या पैशांची माहिती देण्याची मागणी केली होती. यावर पीएमओने ही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. माहिती अधिकाऱ्याच्या कलम ८(१) नुसार एखादी माहिती जाहिर केल्यास तपास यंत्रणेत आणि दोषींविरोधात खटला जाहिर करण्यात अडथळा येत असेल तर अशी माहिती माहितीच्या अधिकारी दिली जाऊ शकत नाही. पीएमओने हेच कारण सांगत माहिती देण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील तेव्हा राम मंदिराचा प्रश्न विचारा – संजय राऊत

‘काळा पैसा हे रहस्य बनून राहिले आहे’

यावर उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन केले होते. परंतु, चार वर्षे निघून गेल्यानंतरही काळ्या पैशासंबंधित काही माहिती समोर आलेली दिसत नाही. त्यामुळे देशात काळ्या पैशांसंबंधीचे गूढ दशकादशक कायमच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर पीएमओने दिलेल्या नकारावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, काळ्या पैशाच्या प्रकरणांचा तपास खास विशेष तपास पथकाद्वारा (एसआयटी) करण्यात येत आहे. त्यामुळे या कारवाईची माहिती आताच सार्वजनिक केली तर तपास प्रक्रियेवर परिणाम होईल, हे नेहमीचे तुणतुणे सरकारने वाजवले आहे. असेच तुणतुणे दुसऱ्या कोणी वाजवले असते तर दाल में कुछ ‘काला’ है अशी हाकाटी ज्यांनी पिटली असती तेच आता सत्तेत आहेत आणि त्याच तुणतुण्याचा आधार घेत आहेत.


हेही वाचा – अब हिंदु चूप नही बैठेगा – उद्धव ठाकरे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here