विक्रोळी सूर्य नगर मध्ये व्यवसायिक सिलेंडरचा ब्लास्ट

विक्रोळी पश्चिम सूर्य नगर येथे हिंदुस्तान बस थांबा, इस्लामपुरा या ठिकाणी व्यवसायिक सिलेंडर चा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात येत असून मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सिलेंडर हाताळत असताना एका सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात एक कामगार गंभीररीत्या जखमी झाला आहे, स्थानिकांनी त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयत दाखल केले आहे.त्याची प्रकृती गंभीर आहे. कामगारांची ओळख अद्याप पटलेली नसून मालक या घटनेनंतर फरार झाला आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले असून साठा करण्यात आलेल्या इतर भरलेले सिलेंडर सुरक्षित स्थळावर हलवण्याचे काम सुरू आहे.

Mumbai