‘हैद्राबाद अत्याचार घटनेतील आरोपींना फाशीच द्या’;एनएसएस विद्यार्थ्यांचे आंदोलन

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय एनएसएस युनिट च्या माध्यमातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर सर व एन. एस. एस चेअरमन डॉ. लक्ष्मण गवळी यांचा मार्गदर्शनाखाली हैद्राबाद येथे यांच्यावर झालेल्या अत्याचार व हत्याकांडाचा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी हातावर काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली. या निषेध कार्यक्रमात महाविद्यालयातील तब्बल ९०० ते १००० विद्यार्थी - विद्यार्थिनी सहभागी झाले होते. "आरोपींना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे" अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी आक्रोश व्यक्त केला. या निषेध कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य सी. डी. भोसले हे सुद्धा उपस्थित होते. तसेच एनएसएस प्रकल्प अधिकारी प्रा. प्रणिता भाले यांनी विद्यार्थिनींना आपत्कालीन प्रसंगी काय केले पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले. (सर्व छाया - सुमीत रेणोसे)

Navi Mumbai